कपिल शर्मा आणि त्याच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, पाहा हा क्यूट फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 17:30 IST2021-02-19T17:29:26+5:302021-02-19T17:30:38+5:30

कपिलने त्याची मुलगी अनायरा सोबत फोटो पोस्ट केला असून या फोटोसोबत गुड मॉर्निंग एव्हरीवन असे लिहिले आहे.

Kapil Sharma gives a peek into his paternity break, shares selfie with daughter Anayra | कपिल शर्मा आणि त्याच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, पाहा हा क्यूट फोटो

कपिल शर्मा आणि त्याच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, पाहा हा क्यूट फोटो

ठळक मुद्देक्यूट फ्रॉक आणि केसाचे दोन बो घातलेली अनायरा या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे. कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या कार्यक्रमाचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकताच त्याचा आणि त्याच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ सहा तासांत 16 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

कपिलने त्याची मुलगी अनायरा सोबत फोटो पोस्ट केला असून या फोटोसोबत गुड मॉर्निंग एव्हरीवन असे लिहिले आहे. क्यूट फ्रॉक आणि केसाचे दोन बो घातलेली अनायरा या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे. कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. कपिलची मुलगी अनायरा नुकतीच 10 डिसेंबरला एक वर्षांची झाली आहे.

कपिलची पत्नी गिन्नीने काहीच आठवड्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कपिलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली होती. बाळ आणि बाळाची आई दोघांचीही प्रकृती उत्तम असून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादांसाठी आभार असे कपिलने ट्वीटमध्ये लिहिले होते.

करवा चौथच्या निमित्ताने कपिलची मैत्रीण भारती सिंगने एक इन्स्टाग्रामवर लाईव्ह केला होता. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता. 

लॉकडाऊन नंतर कपिल शर्मा खूप स्लिम आणि हँडसम दिसत आहे. त्याने लॉकडाऊन दरम्यान ११ किलो वजन कमी केले आहे. लॉकडाऊनपूर्वी कपिलचे वजन ९२ किलो होते. त्याने वजन कमी करून आता त्याचे वजन ८१ किलो झाले आहे. लवकरच तो एका वेबसिरिजमध्ये दिसणार आहे. 

Web Title: Kapil Sharma gives a peek into his paternity break, shares selfie with daughter Anayra