कपिल शर्माने एक्स गर्लफ्रेंड आणि पत्रकाराविरोधात दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 13:44 IST2018-04-07T08:14:52+5:302018-04-07T13:44:52+5:30

कपिल शर्मा आणि वाद हे समीकरण तसे आता जुने झाले आहे. कपिल शुक्रवारी एकानंतर एक ट्वीट केले आणि ते ...

Kapil Sharma filed complaint against X girlfriends and journalist | कपिल शर्माने एक्स गर्लफ्रेंड आणि पत्रकाराविरोधात दाखल केली तक्रार

कपिल शर्माने एक्स गर्लफ्रेंड आणि पत्रकाराविरोधात दाखल केली तक्रार

िल शर्मा आणि वाद हे समीकरण तसे आता जुने झाले आहे. कपिल शुक्रवारी एकानंतर एक ट्वीट केले आणि ते डिलीट देखील केले. यानंतर कपिल म्हणाला त्याचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. कपिलने त्याची एक्स मॅनेजर आणि गर्लफ्रेंड प्रिती सिमोस आणि एका वेबसाईटच्या एडिटरच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कपिलने आरोप केलाय की त्याची मानसिक छळवणूक करण्यात येतेय तसेच त्याच्याकडे 25 लाखांची मागणी करण्यात येतेय. कपिलचा आरोप आहे की या एडिटरने त्याच्याकडून 25 लाख घेतल्यानंतर ही त्याच्याबाबत अफवा पसरवल्या आहेत. तुम्हाला सांगतो याआधी एडिटरने कपिल शर्मावर फोन करुन धमकी दिल्याचा आरोप केला आहे तसेच आपल्या मुलीबाबत अपशब्द उच्चरल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.  

कपिलसाठी याप्रकारचा विवाद काही नाही नवा नाही. नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन तो वादात असतोच. गतवर्षी सुनील ग्रोव्हर सोबत केलेल्या वादामुळे कपिल शर्मा वादात अडकला होता. यानंतर अनेक कलाकारांना कपिलने सेटवर वाट पाहायला लावली आणि शूटिंग केल्याशिवायच या कलाकारांना परतावे लागले. त्याच दरम्यान कपिल डिप्रेशनमध्ये सुद्धा गेल्या होता.   
कपिलच्या फॅमिली टाईम विद कपिल शर्मा या शोच्या दुसऱ्या एपिसोडसाठी टायगर श्रॉफ शूट करणार होता. पण हे शूट कपिलने ऐनवेळी रद्द केले अशा बातम्या मीडियात आल्या होत्या. याआधी देखील द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी कपिलची तब्येत वारंवार बिघडायला लागली होती. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊन शूटिंग न करताच परतावे लागले होते. याही वेळी नेमका हाच कित्ता गिरवला जात असल्याचे म्हटले जात होते. 
 

Web Title: Kapil Sharma filed complaint against X girlfriends and journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.