काम्या पंजाबीने प्रत्युषा बॅनर्जीसाठी लिहिली एक पोस्ट... ती वाचून तुम्हीदेखील व्हाल emotional

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:00 IST2017-01-03T12:42:05+5:302017-01-03T15:00:52+5:30

प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला तिच्या राहात्या घरी गळफास लावून तिचा जीवनप्रवास संपवला. प्रत्युषाच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला होता. ...

Kamya Punjabi wrote a post for Pratyusha Banerjee ... You will be emotional even after reading it | काम्या पंजाबीने प्रत्युषा बॅनर्जीसाठी लिहिली एक पोस्ट... ती वाचून तुम्हीदेखील व्हाल emotional

काम्या पंजाबीने प्रत्युषा बॅनर्जीसाठी लिहिली एक पोस्ट... ती वाचून तुम्हीदेखील व्हाल emotional

रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला तिच्या राहात्या घरी गळफास लावून तिचा जीवनप्रवास संपवला. प्रत्युषाच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला होता. प्रत्युषाने बालिकावधूसारख्या प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येदेखील ती झळकली होती. प्रत्युषा आत्महत्येच्या काही महिन्यांपूर्वीच तिचा प्रियकर राहुल राजसोबत पॉवर कपल या कार्यक्रमात झळकली होती. 
सारा खान, काम्या पंजाबी या प्रत्युषाच्या इंडस्ट्रीतील खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. प्रत्युषा जाऊन कित्येक महिने झाले असले तरी आजही त्या त्यांच्या लाडक्या मैत्रिणीला खूप मिस करत आहेत. काम्याने प्रत्युषासाठी एक खूपच छान पोस्ट नुकतीच सोशल मीडियावर लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, केवळ तुझी आठवण माझ्यासोबत आहे... 2016 साल येताच तुला घेऊन गेले. त्या 2016 सालाला माझा रामराम. यासोबतच काम्याने तिचा आणि प्रत्युषाचा खूपच छान फोटो पोस्ट केला आहे. 
प्रत्युषाने आत्महत्या केली ही गोष्ट तिच्या इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींना पटतच नव्हते. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले असे त्याचे म्हणणे होते. प्रत्युषाच्या आत्महत्येस केवळ तिचा प्रियकर राहुल राज जबाबदार असल्याचे तिच्या मित्रमैत्रिणींने पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते आणि याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजला पोलिसांनी अटकदेखील केली होती. पण काही काळानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
काम्याने नववर्षाची सुरुवात करताना तिच्या मैत्रिणीची म्हणजेच प्रत्युषाची सगळ्यांना आठवण करून दिली आहे. 

Web Title: Kamya Punjabi wrote a post for Pratyusha Banerjee ... You will be emotional even after reading it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.