‘दिया और बाती हम’चा सूरज अडकणार विवाहबंधनात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:55 IST2016-07-26T08:25:02+5:302016-07-26T13:55:02+5:30
'दिया और बाती हम' मालिकेतील सूरज अर्थात अनस रशिद लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.खुद्द अनसनं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. 'दिया और ...

‘दिया और बाती हम’चा सूरज अडकणार विवाहबंधनात !
tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'दिया और बाती हम' मालिकेतील सूरज अर्थात अनस रशिद लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.खुद्द अनसनं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. 'दिया और बाती हम' लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे आणि त्यानंतर आपण विवाह बंधनात अडकणार असल्याचं अनसनं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबीयांसह ईद साजरी करण्यासाठी अनस पंजाबच्या मालेरकोटला या गावी गेला होता. त्यावेळी अनसची एन्गेजमेंट झाल्याचं बोललं जात होतं. मात्र या अफवा असल्याचं अनसनं सांगितलंय. आता मात्र ज्यावेळी दिया और बाती हम संपेल त्यावेळी आपण लग्न करणार असल्याचं त्यानं सांगितलंय.काही दिवसांपूर्वी हिटलर दीदी फेम रती पांड्येसह त्याचं अफेअर असल्याचंच बोललं जात होतं.. मात्र काही दिवसांतच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्याही चर्चा रंगल्या. आता अनस आपल्या पालकांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करणार की दुस-या कुणाशी हे मात्र गुलदस्त्यातच आहे.