Jodha war: Delnaaz returns; Pragati ousted ‘unceremoniously’: complaint filed in CINTAA

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 11:10 IST2016-10-20T16:20:30+5:302016-10-22T11:10:10+5:30

अकबर बिरबल या मालिकेत जोधाची भूमिका डेलनाझ इराणी साकारत होती. पण काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणामुळे तिने ही मालिका सोडली. ...

Jodha war: Delnaaz returns; Pragati ousted 'unceremoniously': filed in CINTAA | Jodha war: Delnaaz returns; Pragati ousted ‘unceremoniously’: complaint filed in CINTAA

Jodha war: Delnaaz returns; Pragati ousted ‘unceremoniously’: complaint filed in CINTAA

बर बिरबल या मालिकेत जोधाची भूमिका डेलनाझ इराणी साकारत होती. पण काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणामुळे तिने ही मालिका सोडली. डेलनाझने ही मालिका सोडल्यानंतर प्रगती मेहरा या मालिकेचा भाग बनली. पण आता प्रगतीऐवजी ही भूमिका पुन्हा एकदा डेलनाझच साकारणार आहे. पण प्रगतीला याची कल्पनाच नसल्याचे तिचे म्हणणे आहे. प्रगतीला काहीही न सांगता या मालिकेतून काढण्यात आले आहे असे तिचे म्हणणे आहे. तिला काही दिवस बरे नसल्याने ती रुग्णालयात दाखल होती. यामुळे तिने चित्रीकरणातून एक आठवड्याची सुट्टी घेतली होती. आठवडा संपल्यावर चित्रीकरणाच्या तारखेची ती वाट पाहात होती. पण त्यावेळी तिला ती मालिकेत नसणार असल्याची बातमी कळली. याविरोधात प्रगतीने सिंटामध्ये तक्रार दाखल केली आहे. पण प्रगतीचे म्हणणे चुकीचे असून डेलनाझ मालिकेत परत येणार असल्याची तिला पूर्ण कल्पना होती असे या मालिकेचे निर्माते निखिल सिन्हा यांचे म्हणणे आहे. ते सांगतात, "प्रगती आणि प्रोडक्शन हाऊस दोघांनी मिळूनच हा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता. त्यामुळे प्रगतीला ही बातमी माहीत नाही हे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे. केवळ आठवड्याभर चित्रीकरण केल्यानंतरच या भूमिकेसाठी मी योग्य नाही असे प्रगतीला वाटत होते. तिने आम्हाला हे सांगितल्यावर आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. काय करायचे हे आम्हाला काहीच कळत नव्हते. त्यामुळे आम्ही डेलनाझशी बोललो. त्यावर डेलनाझने 15 ऑक्टोबरनंतर ती चित्रीकरण करण्यास तयार असल्याचे मला सांगितले. त्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत ही मालिका न सोडण्याची विनंती आम्ही प्रगतीला केली होती. प्रगतीने आमच्या शब्दाचा मान राखून काही दिवस चित्रीकरण केले आणि ठरलेल्या तारखेप्रमाणे डेलनाझने चित्रीकरणाला सुरुवात केली. प्रगतीला या सगळ्या गोष्टींची कल्पना असताना ती आता अशी का बोलत आहे ते आम्हाला कळत नाहीये. खरे तर ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे ती माझ्याशी याबाबत का नाही बोलली हे मलाच कळत नाहीये. 


Web Title: Jodha war: Delnaaz returns; Pragati ousted 'unceremoniously': filed in CINTAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.