'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:13 PM2023-11-30T17:13:07+5:302023-11-30T17:13:42+5:30

'झलक दिखला जा ११' शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात शिवने दमदार परफॉर्मन्स करत सगळ्यांनाच थक्क केलं.

jhalak dikhala ja 11 malaika arora farah khan praised shiv thakare for his dance performance | 'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..."

'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..."

'रोडिज', 'बिग बॉस' अशा रिएलिटी शोमधून लोकप्रियता मिळवलेला शिव ठाकरे 'झलक दिखला जा ११' मध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्येही शिव प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात शिवने दमदार परफॉर्मन्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. त्याचा डान्स पाहून मलायका अरोराबरोबरचफराह खान आणि अर्शद वारसीदेखी भारावून गेले. शिवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

'झलक दिखला जा' शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात शिवने ऊँची है बिल्डिंग या बॉलिवूड गाण्यावर हिप हॉप डान्स केला. त्याचा हा धमाकेदार डान्स पाहून परिक्षकही भारावून गेले. त्याचा डान्स पाहिल्यानंतर फराह खान म्हणाली, "सगळ्यांना मी सांगत असते की तुमच्या डान्समध्ये एक्स फॅक्टर, मसाला असला पाहिजे. हा मसाल्याची दुकान आहे. तुझी टपोरी स्टाइल फक्त तुच करू शकतोस हा ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स होता." 

बॉलिवूडची फॅशन स्टार मलायका अरोरादेखील शिवचा डान्स पाहून थक्क झाली. "शिव ठाकरे खरं सांगू...आतापर्यंत तुझे जेवढे पण परफॉर्मन्स झाले त्यातील हा सगळ्यात बेस्ट होता. हा माझ्यासाठी आग लावणारा परफॉर्मन्स होता, " असं मलायका म्हणाली. 

 शिव त्याच्या मराठमोळ्या अंदाजात नेहमीच चाहत्यांची मनं जिंकून घेत असतो. 'एम टीव्ही'वरील 'रोडीज'मधून तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर शिवने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. दुसऱ्या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. तर 'बिग बॉस हिंदी १६'चा तो रनर अप होता. 'खतरों के खिलाडी'मध्येही त्याने दमदार परफॉर्म केलं होतं. 

Web Title: jhalak dikhala ja 11 malaika arora farah khan praised shiv thakare for his dance performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.