जेठालालचे नवे रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 17:27 IST2016-09-21T11:56:21+5:302016-09-21T17:27:51+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालाल, बबिता आणि अय्यर आता आदिवासींचे रूप धारण करणार आहेत. ते तिघेही ...

Jethalal's new look | जेठालालचे नवे रूप

जेठालालचे नवे रूप

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालाल, बबिता आणि अय्यर आता आदिवासींचे रूप धारण करणार आहेत. ते तिघेही रंगीबेरंगी कपडे घालणार आहेत आणि त्याच अवतारात सोसायटीमध्ये फिरणार आहेत. गणपती उत्सवात जेठालाल, अय्यर आणि बबिता हे तिघे मिळून महबूबा...महबूबा या गाण्यावर नृत्यदेखील सादर करणार आहेत. बबिता ही आदिवासींची राणी बनणार आहे आणि तिचे मनोरंजन करण्यासाठी अय्यर आणि जेठालाल नाचणार आहेत. याविषयी दिलीप जोशी सांगतो, "मेकअप केल्यानंतर स्वतःला आरशात पाहिल्यानंतर मला धक्काच बसला होता. या वेशभूषेमुळे मी खूपच वेगळा दिसत होतो. प्रेक्षकांना माझे हे नवीन रूप आवडेल अशी मला आशा आहे." 

Web Title: Jethalal's new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.