बापरे..! 'तारक मेहता...'च्या सेटवरच झाले जेठालाल व बबितामध्ये कडाक्याचं भांडण, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:35 AM2020-05-19T11:35:36+5:302020-05-19T11:36:38+5:30

मालिकेत जेठालाल व बबिता यांच्यातील केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र पडद्यामागे जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी व बबिता म्हणजे मुनमुन दत्ता यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती.

Jethalal and Babita had a heated argument on the set of 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' TJL | बापरे..! 'तारक मेहता...'च्या सेटवरच झाले जेठालाल व बबितामध्ये कडाक्याचं भांडण, हे आहे कारण

बापरे..! 'तारक मेहता...'च्या सेटवरच झाले जेठालाल व बबितामध्ये कडाक्याचं भांडण, हे आहे कारण

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका तारक मेहता का उल्टा चश्माचे जगभरात चाहते आहेत. ही मालिका लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची फेव्हरिट आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जेठालाल व दयाबेन या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. याशिवाय मालिकेत जेठालाल व बबिता यांच्यातील केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत जेठालाल बबितावर लट्टू असल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र पडद्यामागे जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी व बबिता म्हणजे मुनमुन दत्ता यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती.

दिलीप जोशी व मुनमुन दत्ता यांच्यात 2017 साली बाचाबाची झाली होती. या मालिकेच्या सेटवरच दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्यात वाद झाला. दिलीप जोशी यांचे काही मित्र त्यांना भेटायला सेटवर आले होते. त्यावेळी त्यांनी सेटवरील प्रत्येक कलाकारासोबत फोटो काढले. मुनमुनसोबतही त्यांना फोटो काढायचे होते. मात्र मुनमुनने फोटो काढण्यास नकार दिला आणि जेठालालचे चाहते नाराज झाले. मालिकेच्या टीमबद्दल तुम्ही चुकीची प्रतिमा तयार करत आहात, असे दिलीप जोशी मुनमुनला म्हणाले.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार छोट्या छोट्या गोष्टींसाठी गर्व दाखवणे सोडून द्या, असेही दिलीप जोशी मुनमुनला म्हणाले होते. यावरूनच दोघांमध्ये खूप वाद झाले होते. पण, काही दिवसांनी त्या दोघांमधील मतभेद दूर झाले.


तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत विनोदाच्या मेजवानीसोबतच चांगला मेसेजही प्रेक्षकांना दिला जातो. या मालिकेतील कलाकारांसोबतच दिग्दर्शनही खूप चांगले असते. प्रत्येक पात्रांचं वेगळे वैशिष्ट्ये आहे.

Web Title: Jethalal and Babita had a heated argument on the set of 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.