'बेहद' मालिकेतील जेनिफर विंगेटसह कुशल टंडन काय करतोय मॉरिशिअसमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 12:56 IST2016-12-22T12:47:42+5:302016-12-22T12:56:26+5:30

'बेहद' मालिकेची टीम सध्या मॉरिशिअसमध्ये फुल ऑन रॉक करतेय. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार शूटिंगमधून वेळ काढत मारिशिअसच्या ...

Jennifer Winget is doing a very tedious 'Maritissius' series with 'extremely' series? | 'बेहद' मालिकेतील जेनिफर विंगेटसह कुशल टंडन काय करतोय मॉरिशिअसमध्ये?

'बेहद' मालिकेतील जेनिफर विंगेटसह कुशल टंडन काय करतोय मॉरिशिअसमध्ये?

'
;बेहद' मालिकेची टीम सध्या मॉरिशिअसमध्ये फुल ऑन रॉक करतेय. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार शूटिंगमधून वेळ काढत मारिशिअसच्या बीचवर कुल अंदाजात मजा मस्ती मस्ती करतायेत. जेनिफर विंगेट, कुशल टंडन, अनेरी वजानी आदी कलाकरांनी मस्तीच्या मुडमधील त्यांचे खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लवकरच मॉरिशिअस सुंदर ठिकणं तुम्हाला मालिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वीही आपण अनेक मालिकांमध्ये  परदेशी लोकेशन्स पाहिले आहेत.परदेश सिक्वेन्स दाखवण्यासाठी मालिकांमध्ये एकाहून एक ट्विस्ट निर्मात्यांकडून अवलंबलं जाऊ लागलं. परदेशातल्या ऑफिस मिटींग, सहली,हनीमून असे सिक्वेन्स मालिकांमध्ये टाकण्याचा नवा फंडा मालिका निर्मात्यांनी सुरु केला. परदेशातील आकर्षक ठिकाणं, निसर्गसौंदर्याचा आनंद घरबसल्या घेता येत असल्याने रसिकांनाही ही परदेशातल्या मालिका शुटिंगची कल्पना चांगलीच भावतेय.त्यामुळे बेहद मालिकेनेची टीमही मॉरिशिअसममध्ये पोहचल्यानंतर छोट्या पडद्यावर काय धमाल उडवते हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्याआधी नजर टाकूयात 'बेहद'ची मालिकेच्या कलाकरांनी मॉरिशिअसमधली धुम.











Web Title: Jennifer Winget is doing a very tedious 'Maritissius' series with 'extremely' series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.