'जय जय स्वामी समर्थ'फेम 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सुरु केला आंबाविक्रीचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:47 AM2022-03-29T10:47:12+5:302022-03-29T10:47:59+5:30

Vighnesh joshi :आंब्यांचा सिझन सुरु झाल्यामुळे या लोकप्रिय मराठी अभिनेत्याने आंबा विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने या व्यवसायाची माहिती दिली आहे. 

jay jay swami samartha fame marathi actor vighnesh joshi start mango business | 'जय जय स्वामी समर्थ'फेम 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सुरु केला आंबाविक्रीचा व्यवसाय

'जय जय स्वामी समर्थ'फेम 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सुरु केला आंबाविक्रीचा व्यवसाय

googlenewsNext

सध्याच्या घडीला कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनय क्षेत्राप्रमाणेच इतर क्षेत्रातही नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आज अनेक कलाकारांचा साईड बिझनेस असल्याचं पाहायला मिळतं. यात निवेदिता सराफ यांचा 'हंसगामिनी' हा साडीचा ब्रँड आहे. तर, प्रिया बेर्डे यांनी हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केली आहे. या दिग्गज सेलिब्रिटींनंतर आता मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्याने त्याचा साईड बिझनेस सुरु केला आहे. 

सध्या आंब्यांचा सिझन सुरु झाल्यामुळे या लोकप्रिय मराठी अभिनेत्याने आंबा विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने या व्यवसायाची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेतील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता विघ्नेश जोशी (vighnesh joshi ) याने आंबा विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या व्यवसायाविषयी आणि त्याच्या दुकानाची सविस्तर माहिती दिली आहे.

दरम्यान, ठाण्यातील विष्णूनगर नौपाडा येथे विघ्नेश जोशी याच आंब्याचं दुकान आहे. या पोस्टमध्ये त्यांनी घरपोच सेवा आणि बाहेरगावीदेखील आंबे पोहचवू शकतो असंही म्हटलं आहे. विघ्नेश जोशी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. तसंच गायन-वादनामध्येही त्याचा हातखंडा असल्याचं सांगण्यात येतं.
 

Web Title: jay jay swami samartha fame marathi actor vighnesh joshi start mango business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.