जावेद अली यांनी 'मेरे साई'साठी गायले एक खास सुफी गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 06:30 IST2018-10-12T14:58:59+5:302018-10-14T06:30:00+5:30

गायक जावेद अलीने मेरे साई मालिकेतील विशेष भागासाठी गाणं गायले आहे. हे गाणे सुंदर प्रकारे रेकॉर्ड केले गेले आहे हे गाणे गाताना मला एक अध्यात्मिक आनंद मिळाला असे जावेद म्हणाला आहे.

Javed Ali sang a special Sufi song for 'Mere sai' | जावेद अली यांनी 'मेरे साई'साठी गायले एक खास सुफी गाणं

जावेद अली यांनी 'मेरे साई'साठी गायले एक खास सुफी गाणं

गायक जावेद अली हा त्याच्या अप्रतिम गायनासाठी ओळखले जातात, त्यांनी त्यांच्या आवाजात मेरे साई मालिकेसाठी एक गाणे गाण्याची तयारी दर्शवली आहे जे श्री साईं बाबांच्या समाधीच्या १०० व्या तिथीनिमित्त दाखवण्यात येणाऱ्या भागासाठी चित्रित करण्यात आले आहे.

 या खास गाण्याबाबत जावेद अली यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाले की, 'मेरे साई' मालिकेतील एका प्रसंगासाठी मी हे गाणे गाणार आहे, हा क्षण माझ्यासाठी खूपच अभिमानाचा आहे कारण हा साई बाबांच्या १०० व्या तिथीचा महिना आहे. हे गाणे देवेंद्रजी यांनी लिहिले असून ते खरोखर कमाल आहे. मी टेलिव्हिजन मालिकेसाठी एक सुफी प्रकारचे गाणे गातोय. मेरे साई हा एक सुंदर शो आहे. जेव्हा साईंबाबांचे नाव उच्चारले जाते तेव्हा त्याला एक अध्यात्मिक उंची असते. या गाण्यातील माझ्या सर्व भावना अध्यात्मिक आहेत. संगीतकार देवेंद्र यांनी या विशिष्ट गाण्यासाठी मला संपर्क साधला. त्यांनी मला मालिकेबद्दल आणि गाणे कसे हवे आहे ते थोडक्यात सांगितले आणि मी त्याप्रमाणे ते गायले आहे. हे एक परिस्थितिपूर्ण गाणे आहे जे साईं बाबांच्या समाधीवर आधारित आहे, जेथे लोक विचार करीत आहेत की साईंबाबा समाधीतून परत येतील. हे गाणे सुंदर प्रकारे रेकॉर्ड केले गेले आहे हे गाणे गाताना मला एक अध्यात्मिक आनंद मिळाला."

Web Title: Javed Ali sang a special Sufi song for 'Mere sai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.