पृथ्वी वल्लभमधील जितिन गुलाटी कंटाळला या गोष्टीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 11:36 IST2018-02-16T06:06:41+5:302018-02-16T11:36:41+5:30
अभिनेता जितिन गुलाटी सोनी एंटरटेनमेंट वरच्या पृथ्वी वल्लभ या मालिकेत तैलप ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा ...

पृथ्वी वल्लभमधील जितिन गुलाटी कंटाळला या गोष्टीला
अ िनेता जितिन गुलाटी सोनी एंटरटेनमेंट वरच्या पृथ्वी वल्लभ या मालिकेत तैलप ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत तो मृणालच्या म्हणचेच सोनारिका भोडोरियाच्या भावाची भूमिका साकारत आहे. कोणत्याही भूमिकेसाठी कलाकाराची निवड करण्यासाठी त्या कलाकाराचे ऑडिशन घेतले जाते. तसेच कलाकाराची लूक टेस्ट देखील घेतली जाते. या मालिकेच्या लूक टेस्टसाठी त्याला या व्यक्तिरेखेप्रमाणे रंगभूषा करावी लागली होती. ही त्याची रंगभूषा मालिकेच्या टीमला प्रचंड आवडली होती. पण केशभूषा करता करता जितिन अक्षरशः कंटाळला होता. कारण त्याला केसाच्या आठ ते दहा चाचण्या घ्याव्या लागल्या होत्या. त्याचे कधी केस बांधले गेले तर कधी केस मोकळे सोडले गेले. या मालिकेत जितिन पूर्णवेळ मुकूट घालणार असल्याचे सुरुवातीलाच ठरले होते. त्यामुळे या मुकूटामधून त्याचे केस बाहेर पडत दिसत नाहीत ना हे पाहाण्यासाठी केसाच्या इतक्या ट्रायल घेतल्या जात होत्या. याविषयी जितिन सांगतो, "माझी केस रचना आता चांगली दिसत आहे. पण त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तरीही चित्रीकरण करताना माझ्या केसामुळे अनेक गंमती जमती घडतात. एका दृश्यात मी गंभीर दिसण्याची गरज होती. पण या दृश्याचे चित्रीकरण करत असताना माझा विग निघाला. त्यामुळे हे दृश्य गंभीर न राहाता मजेशीर झाले. माझे विग खाली पडल्यामुळे सगळे मोठ्या मोठ्याने हसायला लागले. हा किस्सा मी कधीच विसरू शकत नाही. तसेच घोड्यावर बसून वॉर सीक्सेस कर असताना मी कधीच विंग घालत नाही. कारण त्यामुळे मला खूप गरम होते. काही दिवसांपूर्वी मी बेशुद्ध पडतो अशा एका दृश्याचे मला चित्रीकरण करायचे होते. मी या दृश्यात इतका मग्न झलो होतो की आजूबाजूला काय सुरू आहे हेच मला कळले नाही. पण अचानक टीममधील सगळे ओरडत असल्याचा मला आवाज आला. तेव्हा मला कळाले की, माझा विग नायिकेच्या ज्वेलरी मध्ये अडकला होता. यामुळे सगळेच खळखळून हसायला लागले होते.”
Also Read : पृथ्वी वल्लभ या मालिकेत आशिष शर्मा आणि सौरव गुर्जरवर चित्रीत करण्यात आले हे कठीण दृश्य
Also Read : पृथ्वी वल्लभ या मालिकेत आशिष शर्मा आणि सौरव गुर्जरवर चित्रीत करण्यात आले हे कठीण दृश्य