या फोटोतील मुलगा बनलाय आज प्रसिद्ध अभिनेता, ओळखा पाहू कोण आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:41 PM2020-06-09T12:41:09+5:302020-06-09T12:42:16+5:30

हा अभिनेता सतरा वर्षांचा असतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

jai malhar fame devdatta nage young age picture viral on social media | या फोटोतील मुलगा बनलाय आज प्रसिद्ध अभिनेता, ओळखा पाहू कोण आहे हा?

या फोटोतील मुलगा बनलाय आज प्रसिद्ध अभिनेता, ओळखा पाहू कोण आहे हा?

googlenewsNext
ठळक मुद्देदेवदत्तचा एक फोटो सध्या इन्स्टाग्रामवर खूपच व्हायरल झाला आहे. देवदत्त सतरा वर्षांचा असतानाचा हा फोटो आहे. त्याचबरोबरीने पिळदार शरीर असलेला सध्याचा त्याचा फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय.

सध्या सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोतील हा मुलगा आता प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. हिरो म्हटलं, की पिळदार शरीर असलेली व्यक्ती डोळ्यासमोर येते. केवळ बॉलीवूडच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी सुद्धा असे पिळदार शरीर राखण्यात मागे नाहीत. 

अभिनेता देवदत्त नागेला जय मल्हार या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. त्यानंतर तो अजय देवगणच्या तान्हाजी या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. सध्या तो डॉक्टर डॉन या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. देवदत्त नागेला व्यायामाची प्रचंड आवड असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांच्या तोडीसतोड शरीर त्याने कमावले आहे. यासाठी तो घेत असलेली मेहनत सर्व तरुणांच्या चर्चेचा आणि प्रेरणेचा विषय ठरते. 

देवदत्तचा एक फोटो सध्या इन्स्टाग्रामवर खूपच व्हायरल झाला आहे. देवदत्त सतरा वर्षांचा असतानाचा हा फोटो आहे. त्याचबरोबरीने पिळदार शरीर असलेला सध्याचा त्याचा फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मेहनत घेतल्यामुळे त्याच्या सुदृढ शरीराला मिळालेलं पिळदार स्वरूप ही तरुणांसाठी नवी प्रेरणा ठरली आहे. जर देवदत्त हे करू शकतो, तर आपण का नाही, असा सकारात्मक विचार त्याचे चाहते करू लागले आहेत. सतराव्या वर्षी, उंच आणि काहीसा सडपातळ असलेला देवदत्त नागे याचा सध्याचा शारीरिक बांधा बघून भलेभले आश्चर्यचकित होत आहेत. त्याच्या छातीची रुंदी, दंडाचा घेर हे त्याने कमावलेल्या शरीराचे उत्तम पुरावे आहेत. त्यामुळेच, मराठी तरुण देवदत्तकडे आदर्श म्हणून पाहतात. त्यातच त्याचा तरुणपणीचा फोटो सुद्धा पाहायला मिळाल्यामुळे आपण सुद्धा त्याच्यासारखे पिळदार शरीरयष्टीचे होऊ शकतो, असे अनेक तरुणांना वाटू लागले आहे.

Web Title: jai malhar fame devdatta nage young age picture viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.