जॅकलीन पडली प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 11:51 IST2016-06-18T06:21:46+5:302016-06-18T11:51:46+5:30
जॅकलीन फर्नांडिस झलक दिखला जा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोचे चित्रकरण नुकतेच करण्यात आले. जॅकलिनला ...

जॅकलीन पडली प्रेमात
ज कलीन फर्नांडिस झलक दिखला जा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोचे चित्रकरण नुकतेच करण्यात आले. जॅकलिनला साध्या कपड्यांपेक्षा अतिशय झगमगीत कपडे खूप आवडतात. तिच्या या पसंतीचा विचार करूनच कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी सोनेरी आणि चमचमीत कपडे तिच्यासाठी डिझाईन करण्यात आले होते. हे कपडे पाहून जॅकलीन खूप खूश झाली. ती त्या कपड्यांच्या प्रेमातच पडली होती. जॅकलिन झलक दिखला जा या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या कार्यक्रमात सगळ्या गोष्टी तिच्या आवडीप्रमाणे केल्या जात असल्याने सध्या तिचा आनंद गगनात मावत नाहीये असे ती सांगते.