ये उन दिनों की बात है फेम रणदीप राय शिकतोय गिटार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:40 IST2018-04-17T06:10:59+5:302018-04-17T11:40:59+5:30

नव्वदचे दशक म्हणजे जादूई मेलोडीचा काळ होता. श्रेष्ठ वादकांनी वाजवलेल्या सुमधूर सुरावटींनी नटलेली मधूर गाणी ऐकणे लोकांना आवडायचे. सोनी ...

It's a matter of those days Fame Randeep Rai learned the guitar | ये उन दिनों की बात है फेम रणदीप राय शिकतोय गिटार

ये उन दिनों की बात है फेम रणदीप राय शिकतोय गिटार

्वदचे दशक म्हणजे जादूई मेलोडीचा काळ होता. श्रेष्ठ वादकांनी वाजवलेल्या सुमधूर सुरावटींनी नटलेली मधूर गाणी ऐकणे लोकांना आवडायचे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ये उन दिनों की बात है मध्ये आता समीर (रणदीप राय) गिटार वाजवत आपल्या प्रेयसीसाठी म्हणजेच नैना (आशी सिंह) साठी प्रणयमधूर गीतांचा वर्षाव करणार आहे.
रणदीपचे व्यक्तिमत्व बहुमुखी आहे. त्याने आपले क्रीडा कौशल्य एक निष्णात क्रिकेटपटू म्हणून दाखवले आहे, बऱ्याच शो मध्ये आपल्या बायकिंग कौशल्याचे प्रदर्शन करत त्याने आपल्या मोटरसायकलींच्या वेडाची झलक दाखवली आहे आणि आता हा तरूण अभिनेता गिटार वाजवत आपल्या संगीत कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. गिटार कसा वाजवायचा याचे प्रशिक्षण रणदीप घेत आहे. प्रॉडक्शन टीमने त्याच्यासाठी एका संगीत शिक्षकाची सुद्धा व्यवस्था केली आहे, जो रणदीपला यामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवण्यास मदत करेल. रणदीपने याविषयी सांगितले, “संगीत वाद्य वाजवणे शिकण्याची आधीपासूनच मला इच्छा होती. गिटार वाजवणे हे तर माझे स्वप्नच होते. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मी हे वाद्य वाजवताना दिसणार आहे आणि त्यासाठी मी खास गिटार वाजवायला देखील शिकलो आहे. मी गेल्या काही दिवसांपासून गिटारच्या सरावासाठी रोज २०-२५ मिनिटे देतो आहे.”
ये उन दिनों की बात है मालिकेत नव्वदच्या दशकातील कथा दाखवली जात असून या मालिकेत प्रेक्षकांना तो काळ पाहायला मिळत आहे. या मालिकेतील समीर म्हणजेच रणदीप राय आणि नैना म्हणजेच आशी सिंह यांची प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील समीर आणि नैना यांची प्रेमकथा ही एका जोडप्याच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हे जोडपे म्हणजे दुसरे कोणीही नसून शशी सुमीत प्रॉडक्शनचे शशी आणि सुमित मित्तल आहेत.  मालिका सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत समीर ही भूमिका साकारणार्‍या रणदीप रायचे चाहते त्याची तुलना 90च्या दशकातील प्रेक्षकांचे लाडके हिरो शाहरुख आणि सलमान यांच्याशी सध्या करत आहेत.  

Web Title: It's a matter of those days Fame Randeep Rai learned the guitar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.