It's confirmed! ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान या तारखेला करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 16:21 IST2017-01-02T16:21:56+5:302017-01-02T16:21:56+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने ही मालिका नुकतीच सोडली. हिना खानला या ...

It's confirmed! What is this relation? Marriage to Fame Hina Khan on this date | It's confirmed! ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान या तारखेला करणार लग्न

It's confirmed! ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान या तारखेला करणार लग्न

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने ही मालिका नुकतीच सोडली. हिना खानला या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा घेतलेला निर्णय सगळ्यांसाठी धक्कादायक होता. हिनाने लग्नबंधनात अडकण्यासाठी ही मालिका सोडली असे म्हटले जात होते. पण यावर हिनाने मौन राखणेच पसंत केले होते. पण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
हिना खान आणि निर्माता रॉकी जैस्वाल यांच्या प्रेमप्रकरणाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवरच त्या दोघांची भेट झाली होती. ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत.

hina khan rocky jaiswal
हिना नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. पण नुकतेच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी एक मुलाखत दिली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिनाने म्हटले आहे की, "माझ्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. माझ्या कानावर अनेक गोष्टी पडूनदेखील मी त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतेय. पण आज मी माझ्या फॅन्सना सांगू इच्छिते की, मी सध्या तरी लग्नाचा काहीही विचार केलेला नाहीये. मी अडीज-तीन वर्षं तरी लग्न करणार नाहीये. प्रत्येक गोष्ट करण्याची योग्य अशी एक वेळ असते. योग्य वेळ येईल तेव्हा मी लग्न करेन. सध्या तरी माझा संपूर्ण वेळ मी माझ्या नवीन मालिकेला देण्याचा ठरवला आहे."

Web Title: It's confirmed! What is this relation? Marriage to Fame Hina Khan on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.