ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर रणदीप रायला मिळाली नवी मैत्रीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:20 IST2018-04-16T09:50:35+5:302018-04-16T15:20:35+5:30
मैत्री करताना वय, जात, धर्म काहीही पाहिले जात नाही. मैत्रीला वयाचे बंधन नसते. सोनी टीव्हीच्या ये उन दिनों की ...

ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर रणदीप रायला मिळाली नवी मैत्रीण
म त्री करताना वय, जात, धर्म काहीही पाहिले जात नाही. मैत्रीला वयाचे बंधन नसते. सोनी टीव्हीच्या ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर अशीच एक मैत्री सगळ्यांना पाहायला मिळत आहे. रणदीप राय (समीर महेश्वरी) याची दहा वर्षांच्या रिद्धिमा (दीपिका) सोबत अशी लोभस मैत्री झाली आहे. चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणाऱ्या वेळात ते दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात. ते कधी खेळतात तर कधी गप्पा मारताना दिसतात. सध्याच्या तापदायक झालेल्या उन्हाळ्यात प्रत्येकाने त्यावर मात करण्याचे आपापले मार्ग शोधले आहेत. रणदीप आणि दीपिका बर्याचदा विश्रांतीच्या वेळेत आइसकॅन्डी खाताना दिसतात. रिद्धिमा या मालिकेत दीपिका ही व्यक्तिरेखा साकारत आहे. समीर सध्या दिल्लीत राहावयास गेला असल्याचे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. दिल्लीत समीर ज्या कुटुंबासोबत राहात आहे, त्या कुटुंबाची रिद्धिमा सदस्य आहे. रणदीप आणि दीपिकाच्या मैत्रीविषयी रणदीप सांगतो, “सेटवर दीपिका आणि माझी छान गट्टी जमली आहे. ती खूपच गोड आहे. सेट्सवर विश्रांतीच्या वेळेत आम्ही गप्पा मारतो आणि कधी कधी आमच्या सह-कलाकारांच्या खोड्या काढतो. विश्रांतीच्या वेळेत आइस कॅन्डी खाणे हा आमचा आवडता उद्योग आहे. तिच्यासोबत काम करायला खूप मजा येते. कारण तिच्यात एक वेगळाच उत्साह सळसळत असतो आणि ती आसपास असताना वातावरण कधीच उदासवाणे होत नाही. आमच्या टीममधल्या सर्वांची ती लाडकी आहे. कधी मी माझ्या कंपूमधील सहकार्यांच्या आठवणीने उदास होतो, तेव्हा ती तिच्या माकडचेष्टांनी मला हसवते.”
ये उन दिनों की बात है या मालिकेच्या आगामी भागात समीर नैनाला भेटण्यासाठी एक दिवसासाठी दिल्लीहून अहमदाबादला यायचे ठरवतो. काही घटनांमुळे समीर आणि नैना यांच्यात भांडण होते आणि दोघे एकमेकांना आपली अडचण सांगू शकत नाहीत. यातून पुढे काय होणार? समीर नैनाची क्षमा मागणार का? ते आपसांतील गैरसमज विसरून पुन्हा एकत्र येणार का? याची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये मिळणार आहे.
Also Read : ये उन दिनो की बात है या मालिकेत पाहायला मिळणार शशी आणि सुमित मित्तलची लव्हस्टोरी