भगवान शिवची भूमिका साकारणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 20:44 IST2016-11-27T19:59:37+5:302016-11-27T20:44:22+5:30

सध्या टेलिव्हिजनवर मायथॉलॉजिकल सीरियल्सचा ट्रेंड सुरू आहे. वाढता टीआरपी बघता निर्माते अशाप्रकारच्या एकापाठोपाठ एक मालिका घेऊन येत आहेत. सध्या ...

It is difficult to play the role of Lord Shiva | भगवान शिवची भूमिका साकारणे अवघड

भगवान शिवची भूमिका साकारणे अवघड

्या टेलिव्हिजनवर मायथॉलॉजिकल सीरियल्सचा ट्रेंड सुरू आहे. वाढता टीआरपी बघता निर्माते अशाप्रकारच्या एकापाठोपाठ एक मालिका घेऊन येत आहेत. सध्या ‘कर्मफल दाता शनि’ ही मालिका चर्चेत असून, अभिनेता तरुण खन्ना याने साकारलेली भगवान शिवची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परंतु तरुणच्या मते ही भूमिका साकारणे सोपे नाही. 

गेल्या तेरा वर्षांपासून तरुण छोट्या पडद्यावर झळकत असून, ‘कभी आए न जुदाई, महादेव’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने अभिनयाची छाप सोडली आहे. छोट्या पडद्यावरच नव्हे तर ‘रंग रसिया, ढिशूम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तरुणने भूमिका साकारल्या आहेत. 

सध्या तो ‘शनि’ या मालिकेत भगवान शिवची भूमिका अतिशय भारदस्तपणे साकारत आहे. वास्तविक त्याला मायथॉलॉजिकल शोमध्ये काम करायला अजिबात आवडत नाही. त्याच्या मते, अशाप्रकारच्या शोज्मध्ये हार्ड वर्क प्रचंड करावे लागते. कारण एका व्यक्तीमधून देवाच्या भूमिकेत शिरणे सोपी बाब नाही. त्यातच आपल्याला केवळ प्रचलित असलेल्या धार्मिक कथांचा आधार घेऊनच प्रेक्षकांसमोर जावे लागत असल्याने हा एक टफ जॉब आहे अन् याची जाणीव मला सुरुवातीपासून होती. 

अशातही मी या मालिकेसाठी होकार दिला. कारण ही कथा मला भावली असून, वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या शोमध्ये एंट्री करण्याअगोदर तरुणने ‘पुलिस फॅक्टरी’मध्ये काम केले होते. 



‘शनि’ मालिकेत भगवान शिवच्या भूमिकेत तरुण खन्ना

Web Title: It is difficult to play the role of Lord Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.