इश्तियाक खानला हे स्वप्न पूर्ण करण्याची आहे इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 11:04 IST2018-03-21T05:34:52+5:302018-03-21T11:04:52+5:30

अभिनेता इश्तियाक खान 'हर शांख पे ऊल्लू बैठा है' मध्ये सीएम चैतू लालचा नातेवाईक असतो.तोसुद्धा राजकारणी आणि चैतू लाल ...

Ishtiaq wants to fulfill this dream! | इश्तियाक खानला हे स्वप्न पूर्ण करण्याची आहे इच्छा!

इश्तियाक खानला हे स्वप्न पूर्ण करण्याची आहे इच्छा!

िनेता इश्तियाक खान 'हर शांख पे ऊल्लू बैठा है' मध्ये सीएम चैतू लालचा नातेवाईक असतो.तोसुद्धा राजकारणी आणि चैतू लाल एवढाच अशिक्षित आहे.वेगवेगळ्‌या घोटाळ्‌यांसाठी कमिशन घेऊन तो कमाई करतो.वास्तवात सामान्य माणसासाठी राजकारणाची परिस्थिती कशी आहे यावर हा शो प्रकाश टाकतो.फिल्म उद्योगामध्ये प्रवेशासाठी इश्तियाकने भरपूर स्ट्रगल केला.हा शो त्याच्यासाठी टेलिव्हिजनवरील प्रथम ब्रेक आहे.तो म्हणतो,“माझ्या उंचीमुळे मला नेहमीच विनोदी भूमिका मिळाल्या आणि इतर कलाकारांना ज्या भूमिका अगदी सहजपणे मिळतील अशा भूमिका मला मिळणे खूप कठीण झाले.एक यशस्वी अभिनेता बनण्यासाठी मी मुंबईला आलो आणि मला इथे माझी अशी खास जागा बनवायची होती,जी अन्य कोणीच घेऊ शकणार नाही.मला माझे एक वेगळे अस्तित्व निर्माण करायचे आहे आणि लोकांनी मला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखावे अशी माझी इच्छा आहे.”हा शो सध्या देशातील राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकतो आणि एका राजकारण्याच्याच दृष्टीतून राजकारणाचे विभिन्न कंगोरे पाहतो.


हा मुख्यमंत्री निरागस जनतेला खोटी आश्वासने देऊन भूलवण्यासाठी मानला जातो.अन्य कुठल्याही नेत्याप्रमाणे चैतू हा कटकारस्थानी आहे,शब्दांचा खेळ करणारा आणि संधीसाधू आहे.त्याच्या ठेंगा पार्टीला केवळ काळ्‌या पैशाची हाव आहे आणि त्यासाठी सिस्टममध्ये काहीही कारस्थाने ते करू शकतात.सामान्य लोकांना ज्या गोष्टीचा फायदा होईल त्याची वचने तो देतो पण त्याला ज्याचा फायदा होईल ते तो करतो.ह्या कॉमेडी शोमध्ये त्याला समर्थन देईल त्याची पत्नी इमली देवी (समता सागर).आयुष्यातील प्रत्येक चांगल्याकठीण परिस्थितीमध्ये ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहते.जरी चैतू सत्ताधारी पक्षाचा नेता असला तरी घरी मात्र त्याची पत्नीच त्याच्यासाठी आधारस्तंभ आहे.इमलीला आपला भाऊ आणि सीएमचा उत्साही साला पुतन (इश्तियाक खान) ला देशाचा पंतप्रधान बनलेले पाहायचे आहे.'हर शांख पे ऊल्लू बैठा है' यात चैतू लाल सामान्य माणसांच्या समस्या जसे शिक्षण, पायाभूत सुविधा,भ्रष्टाचार इत्यादींसोबत लढताना आणि निवडणूकांमधील धांदली,एमएलएची खरेदी विक्री आणि जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या काहीही कमिट्‌या निर्माण करतानाही पाहायला मिळेल.

Web Title: Ishtiaq wants to fulfill this dream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.