n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">हमकोे तुमसे हो गया है प्यार क्या करे या मालिकेत अनोखीची भूमिका साकारणारी इशानी शर्माला काही दिवसांपूर्वी चित्रीकरण करत असताना तिच्या भूतकाळातील एक गोष्ट प्रकर्षाने आठवली. या मालिकेत अनोखीला दुखापत झाल्यामुळे तिने काही दृश्यांसाठी एका पायावर उभे राहायचे असे ठरले होते. पण खऱ्या आयुष्यात इशानीचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते आणि त्यामुळे तिच्या एका पायात लोखंडी सळी बसवण्यात आली होती. या गोष्टीचा त्रास इशानीला इतरवेळी जाणवत नाही. पण चित्रीकरणासाठी अनेक तास केवळ एका पायावर उभे राहाणे तिच्यासाठी खूपच कठीण झाले होते. तरीही तिने पूर्वी फ्रॅक्चर झालेला पाय हवेत ठेवला आणि सगळा भार तिच्या दुसऱ्या पायावर टाकला. या दृश्यांचे चित्रीकरण करताना मला खूपच त्रास झाला. तसेच मला दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटना आठवल्या असे इशानी सांगते.