इशान - जान्हवी झळकणार छोट्या पडद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 10:45 IST2018-07-12T10:45:00+5:302018-07-12T10:45:54+5:30

छोट्या पडद्यावर सध्या विविध रिअॅयिटी शोची धूम पाहायला मिळते आहे. या शोच्या माध्यमातून उद्योन्मुख स्पर्धकांना त्यांच्या कला दाखवण्याची उत्तम संधी मिळत आहे.

Ishaan Khattar and Jhanvi Kapoor, Karan Johar On the Set Of Dil Hai Hindustani 2 | इशान - जान्हवी झळकणार छोट्या पडद्यावर!

इशान - जान्हवी झळकणार छोट्या पडद्यावर!

सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार एकही संधी सोडत नाही.सध्याच्या सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचे कलाकार प्रमोशन करताना दिसतात.छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या कार्यक्रमात विविध सिनेमांचं प्रमोशनही करण्यात येतं.म्हणून आगामी धडक सिनेमाच्या प्रमोशनसाठी ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांनाही छोट्या पडद्याचा आधार घ्यावा लागला.छोट्या पडद्यावर सध्या विविध रिअॅयिटी शोची धूम पाहायला मिळते आहे. या शोच्या माध्यमातून उद्योन्मुख स्पर्धकांना त्यांच्या कला दाखवण्याची उत्तम संधी मिळत आहे. शिवाय दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शनही या स्पर्धकांना लाभतं आहे.

 छोट्या पडद्यावरील असाच एक शो ‘दिल है हिंदुस्तानी-2’  रिअॅलिटी शो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.त्यामुळेच आता करण जोहरसह  जान्हवी आणि इशान यांनी ‘दिल है हिंदुस्तानी-2’या शोमध्ये हजेरी लावली होती.यावेळी स्पर्धकांच्या गाण्यांवर ईशान आणि जान्हवी डान्स करुन सा-याचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमाचे सुनिधी चौहान, बादशहा आणि प्रीतम हे संगीत क्षेत्रातील तीन दिग्गज या शोचे परीक्षक आहेत. या तिघांसह करण जोहर,इशान आणि जान्हवी यांनी खूप धमाल केली. 


सैराटची रुपेरी पडद्यावरील जादू पाहून बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा हिंदीत रिमेक करण्याचं ठरवलं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान खट्टर यांना घेऊन सैराट सिनेमाचा रिमेक धडक सिनेमाची घोषणा करणने केली होती. तेव्हापासूनच धडक सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Ishaan Khattar and Jhanvi Kapoor, Karan Johar On the Set Of Dil Hai Hindustani 2