Video : मराठी अभिनेता घेत होता हार्दिक पांड्याची बाजू; काकांनी केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:58 PM2024-04-15T17:58:58+5:302024-04-15T17:59:49+5:30

रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोलही केलंही जात आहे. पण, हार्दिकच्या चाहत्यांकडून त्याला पाठिंबा मिळत आहे. अशाच एका मराठी अभिनेत्यानेही हार्दिकची बाजू घेतली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

ipl 2024 marathi actor support hardik pandya rohit sharma fans troll him video viral | Video : मराठी अभिनेता घेत होता हार्दिक पांड्याची बाजू; काकांनी केली बोलती बंद

Video : मराठी अभिनेता घेत होता हार्दिक पांड्याची बाजू; काकांनी केली बोलती बंद

आयपीएलचा १७वा हंगाम जोरात सुरू आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. रोहित शर्माला वगळून हार्दिकला मुंबईचा कॅप्टन केल्याने चाहते अजूनही नाराज आहेत. त्यात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची समाधानकारक कामगिरी नसल्याने चाहत्यांची नाराजी वाढली आहे. रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोलही केलंही जात आहे. पण, हार्दिकच्या चाहत्यांकडून त्याला पाठिंबा मिळत आहे. अशाच एका मराठी अभिनेत्यानेही हार्दिकची बाजू घेतली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

स्टेडियममध्येही सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिकला ट्रोल केलं जातं. काही सामन्यात त्याला छपरी बोललं गेलं होतं. त्याबाबत मराठी अभिनेता रुचिर गुरव याने नाराजी व्यक्त करत . "आजही फिल्डिंग करताना हार्दिक पांड्याला छपरी छपरी बोलत होते. मुंबईचा राजा रोहित शर्मा असं लोक म्हणत होते. जे चुकीचं आहे," असं रुचिर म्हणाला. त्यानंतर हार्दिक पांड्याची बाजू घेणाऱ्या रुचिरची शेजारी उभ्या असलेल्या काकांनी बोलतीच बंद केली. "१०० टक्के मुंबईचा राजा रोहित शर्माच आहे" असं काका म्हणाले. त्यानंतर त्यांनी "मुंबईचा राजा रोहित शर्मा" अशा घोषणाही दिल्या.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सलग ३ पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध विजय मिळवत MI ने विजयी पताका कायम ठेवली. पण, रविवारी CSK विरुद्धच्या सामन्यात MI ला पराभव पत्कारावा लागला. 

 

Web Title: ipl 2024 marathi actor support hardik pandya rohit sharma fans troll him video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.