​वारिस या मालिकेचा प्रोमो चित्रीत करताना फरनाझ शेट्टीला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 17:26 IST2017-02-27T11:56:56+5:302017-02-27T17:26:56+5:30

वारिस ही मालिका लवकरच 10 वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत फरनाझ शेट्टीची एंट्री होणार आहे . फरनाझ या ...

Injury by Farnaz Shetty while filming promissory note of the heirs | ​वारिस या मालिकेचा प्रोमो चित्रीत करताना फरनाझ शेट्टीला झाली दुखापत

​वारिस या मालिकेचा प्रोमो चित्रीत करताना फरनाझ शेट्टीला झाली दुखापत

ref="http://cnxmasti.lokmat.com/television/news/balika-vadhu-fame-farzaan-shetty-in-waaris/18153">वारिस ही मालिका लवकरच 10 वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत फरनाझ शेट्टीची एंट्री होणार आहे. फरनाझ या मालिकेत मनूची भूमिका साकारणार आहे. मनू लहानपणी ज्याप्रकारे मुलाच्या वेशात वावरायची, त्याप्रमाणे ती मोठी झाल्यावरही राहात असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेत प्रेक्षकांना फरनाझ एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना नुकतीच फरनाझला दुखापत झाली. 
वारिस या मालिकेतील भूमिकेसाठी फरनाझ सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या मालिकेत ती एका पंजाबी मुलाच्या रूपात दिसणार असून ती मुलाप्रमाणे पगडी घालणार आहे. ती तिचे संवाददेखील एखाद्या मुलाप्रमाणेच बोलणार आहे. या मालिकेच्या प्रोमोचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. या प्रोमोसाठी तिने काही स्टंट परफॉर्म केले. या प्रोमोतील तिची एंट्री अतिशय डॅशिंग असून घोड्यावर बसून तिची एंट्री होणार आहे. या प्रोमोचे चित्रीकरण करण्यासाठी फरनाझला घोड्यावर बसायचे होते. पण आजूबाजूला खूप ढोल ताशे वाजत असल्याने या आवाजामुळे घोडा चवथळला आणि त्याने फरनाझच्या पायावर अनेकवेळा पाय दिला. खरे तर तिच्या पायाला आधीपासूनच लागले असल्यामुळे तिला खूपच त्रास होत होता. पण त्या अवस्थेतही तिने घोड्याला शांत केले आणि ते चित्रीकरण पूर्ण केले. याविषयी फरनाझ सांगते, "मनू या व्यक्तिरेखेसाठी चित्रीकरण करताना मला खूप मजा येत आहे. माझी भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी मला सगळे खूप मदत करत आहे. माझ्या पायाला काही दिवसांपूर्वी लागले होते आणि त्यात घोड्याने माझ्या पायावर वारंवार पाय दिल्याने मला चांगलाच त्रास होत होता. पण त्यानंतर घोडा चांगल्या मूडमध्ये आल्याने मी कसलाच विचार न करता त्या अवस्थेतही चित्रीकरण पूर्ण केले." 



Web Title: Injury by Farnaz Shetty while filming promissory note of the heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.