"ड्रायव्हरचा डोळा लागला अन् कार...", प्रसिद्ध गायकाच्या अपघाताची भयावह कहाणी, आता कशी आहे तब्येत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:33 IST2025-05-05T16:32:26+5:302025-05-05T16:33:08+5:30
इंडियन आयडॉलचा विनर गायकाचा आज मध्यरात्री अपघात झाला. ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे हा भीषण अपघात झाला. हा अपघात कसा घडला आणि सध्या गायकाची तब्येत कशी आहे? जाणून घ्या

"ड्रायव्हरचा डोळा लागला अन् कार...", प्रसिद्ध गायकाच्या अपघाताची भयावह कहाणी, आता कशी आहे तब्येत?
इंडियन आयडॉलचा विजेता आणि प्रसिद्ध गायक पवनदीप राजनचा (pawandeep rajan) अपघात झाल्याच्या वृत्ताने सर्वांना चांगलाच धक्का बसला. पवनदीपला अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पवनला जबर दुखापत झाल्याचं फोटोमधून समोर आलंय. उत्तराखंड येथून दिल्लीला जात असताना पवनचा हा अपघात झाला. हा भीषण अपघात कसा झाला, याविषयीची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरचा डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचं समजतंय. जाणून घ्या.
ड्रायव्हरचा डोळा लागला अन्...
मीडिया रिपोर्टनुसार, पवनदीपच्या गाडीचा अपघात अमरोहा जिल्ह्यातील गजरौला भागात झाला. गजरौला येथील नॅशनल हायवे ९ ला मध्यरात्री हा अपघात झाला. पवनदीप त्याचं घर अर्थात उत्तराखंडहून दिल्लीला येत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी ड्रायव्हरचा डोळा लागल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे कार कंटेनरला जाऊन धडकली. यामध्ये पवनदीपच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने पवनदीप यातून बचावला. परंतु त्याच्या दोन्ही हाताला गंभीर जखम झाली आहे. या दुर्घटनेत पवनदीप आणि त्याचे २ मित्रही जखमी झाले आहेत.
पवनदीप राजनविषयी
पवनदीप राजनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'इंडियन आयडॉल'च्या १२ व्या सीझनचं विजेतेपद पटकावल्यानंतर तो त्याच्या स्वतःच्या गायनाचे कार्यक्रम करताना दिसतो. भारतात नव्हे तर परदेशातही पवनदीप राजनच्या म्यूझिक कॉन्सर्टला त्याचे चाहते हजेरी लावत असतात. सोनू निगम, सलीम मर्चंट अशा अनेक दिग्गज गायक पवनच्या गाण्याचं कौतुक करताना दिसतात. पवन या अपघातातून सावरुन लवकर बरा होईल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.