Indian Idol: पवनदीप राजनचे आहे सलमान खानसोबत हे खान कनेक्शन, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 01:09 PM2021-08-14T13:09:36+5:302021-08-14T13:10:17+5:30

इंडियन आयडॉल १२चा अंतिम सोहळा उद्या पार पडणार आहे. टॉप ६ स्पर्धकांपैकी इंडियन आयडॉल शोचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Indian Idol: Pawandeep Rajan has this Khan connection with Salman Khan, watch the video | Indian Idol: पवनदीप राजनचे आहे सलमान खानसोबत हे खान कनेक्शन, पहा व्हिडीओ

Indian Idol: पवनदीप राजनचे आहे सलमान खानसोबत हे खान कनेक्शन, पहा व्हिडीओ

googlenewsNext

इंडियन आयडॉल १२चा अंतिम सोहळा उद्या पार पडणार आहे. टॉप ६ स्पर्धकांपैकी इंडियन आयडॉल शोचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. शोमध्ये सर्वात ट्रेंडिंग स्पर्धक आहे पवनदीप राजन. सोशल मीडियावर पवनदीप सर्वात जास्त चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पवनदीप राजनचे सलमान खानसोबत स्पेशल कनेक्शन आहे.

सोशल मीडियावर सलमान खान आणि पवनदीप राजनचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात दोघे एकत्र गाणे गाताना दिसत आहेत. व्हायरल क्लिपमध्ये सलमान खान पवनदीप राजनसोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. सलमान खान तडप तडप के हे गाणं गाताना दिसतो आहे. सलमान खानचे हे गाणे हम दिल दे चुके सनम चित्रपटातील आहे. या व्हिडीओत सलमान खान आणि पवनदीपचे बॉण्डिंग चांगले दिसते आहे.


असे वृत्त आहे की पवनदीप राजन सलमान खानच्या राधे चित्रपटासाठी गाणे गाऊ शकतो. मात्र नंतर स्वतः पवनदीपने सलमान खानसोबत काम करत नसल्याचे सांगितले. पवनदीपने आवर्जुन सांगितले की, तो आणि सलमान खान राधेमध्ये एकत्र काम करत नाही. मात्र तो सलमानच्या दुसऱ्या चित्रपटासाठी काम करेल. अद्याप गायक आणि निर्मात्यांनी या प्रोजेक्टबद्दल जास्त खुलासा केला नाही.


इंडियन आयडॉलच्या अंतिम सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. टॉप ६मध्ये पवनदीप राजन, अरूणिता कांजीलाल, शनमुख प्रिया, सायली कांबळे, मो. दानिश, निहाल ताउरो यांचा समावेश आहे. अंतिम सोहळा १२ तास चालणार आहे. या सोहळ्याला संगीत जगतातील प्रसिद्ध सेलिब्रेटी पाहुणे म्हणून उपस्थिती लावणार आहेत. तसेच शेरशाह चित्रपटातील प्रमुख कलाकारदेखील हजेरी लावणार आहेत.

Web Title: Indian Idol: Pawandeep Rajan has this Khan connection with Salman Khan, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.