Indian Idol 2018 : सलमान अली ठरला ‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 23:36 IST2018-12-23T23:33:40+5:302018-12-23T23:36:07+5:30
‘इंडियन आयडॉल’ या म्युझिक रिअॅलिटी शोच्या दहाव्या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला. आज रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सलमान अली याला विजेता घोषित करण्यात आले.

Indian Idol 2018 : सलमान अली ठरला ‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता!
‘इंडियन आयडॉल’ या म्युझिक रिअॅलिटी शोच्या दहाव्या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला. आज रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सलमान अली याला विजेता घोषित करण्यात आले.
सलमानने नितीन कुमार, अंकुश भारद्वाज, नीलांजना रे आणि विभोर पाराशर अशा चौघांवर मात करत, ‘इंडियन आयडॉल 10’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सुरूवातीपासूनच सलमान या शोमधील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता़ त्याच्या आवाजाने अख्ख्या देशाला वेड लावले होते.
विजेत्याची घोषणा होण्यापूर्वी ‘इंडियन आयडॉल 10’चे ग्रॅण्ड फिनालेचा रंगारंग कार्यक्रम रंगला. ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ हे बॉलिवूड स्टार्स ‘झिरो’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले.
‘इंडियन आयडॉल 10’चे जज विशाल डडलानी, नेहा कक्कड, जावेद अली यांच्यासोबतचं सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल, गायक सुरेश वाडकर, बप्पी लहिरी, अलका याग्निक असे संगीत क्षेत्रातील दिग्गजही या ग्रॅण्ड फिनालेच्या रंगारंग कार्यक्रमात दिसले.
सुरांनी सजलेल्या या सोहळ्यात ‘इंडियन आयडॉल 10’च्या पाचही फायनलिस्टनी एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केलेत. प्यारेलाल, सुरेश वाडकर, बप्पी दा, अलका याग्निक यांच्यासोबतही त्यांनी परफॉर्म केला. स्पर्धक नितीन कुमार यावेळी शाहरूख खानसोबत थिरकताना दिसला़ जज जावेद अली, नेहा कक्कड, विशाल ददलानी यांचेही धमाकेदार परफॉर्मन्स झालेत.
मनीष पॉल झाला भावूक
‘इंडियन आयडॉल 10’ची ‘जान’ असलेला या कार्यक्रमाचा होस्ट मनीष पॉल ग्रॅण्ड फिनालेमध्ये भावूक झालेला दिसला. ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेदरम्यान मनीषचा होस्ट, अभिनेता बनण्यापर्यंतचा संघर्ष दाखवण्यात आला. मनीषसाठी हे मोठ्ठे सरप्राईज होते. आपल्या संघर्षाच्या दिवसांचा व्हिडिओ पाहून मनीषच्या डोळ्यात अश्रू तरळले.