Indian Idol 12: ईदच्या निमित्ताने दानिश मोहम्मदला परीक्षकांकडून मिळाली ईदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:48 PM2021-05-12T20:48:43+5:302021-05-12T20:49:16+5:30

इंडियन आयडॉलचा १२वा सीझनच्या आगामी वीकेंडच्या भागात लोकप्रिय गायक सुखविंदर सिंग हजेरी लावणार आहे.

Indian Idol 12: On the occasion of Eid, Danish Mohammad received Eid from the examiners | Indian Idol 12: ईदच्या निमित्ताने दानिश मोहम्मदला परीक्षकांकडून मिळाली ईदी

Indian Idol 12: ईदच्या निमित्ताने दानिश मोहम्मदला परीक्षकांकडून मिळाली ईदी

googlenewsNext

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलचा १२वा सीझनच्या आगामी वीकेंडच्या भागात लोकप्रिय गायक सुखविंदर सिंग हजेरी लावणार आहे. तो या कार्यक्रमात आपल्या स्पर्धकांबरोबर काही अफलातून परफॉर्मन्सेस देताना दिसणार आहे. आदित्य नारायण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करेल तर हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि अन्नू मलिक परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांसाठी हा संगीत, मनोरंजन आणि हास्यविनोदाने भरलेला भाग म्हणजे एक पर्वणीच असेल.
 
या आगामी भागात सर्वच स्पर्धक आपल्या गाण्याने प्रमुख अतिथी सुखविंदर यास प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील, पण दानिश हा त्याचा फार मोठा चाहता असल्याने तो तर परफॉर्म करण्यास फारच उत्सुक होता. दानिश आणि सायली यांनी ‘बीडी जलई ले’ आणि ‘प्रेम जाल मेन फंस गई तू तो’ ही गाणी सादर करून त्याच्या गुणवत्तेने सगळ्यांना थक्क करून सोडले. 


अन्नू मलिक म्हणाले की, त्याला वाटत होते की जणू तो एखादा लाईव्ह कार्यक्रम पाहात असावा. जेव्हा सुखविंदरला त्याचे मत विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, ही तरुण आणि हुशार मुले फारच गुणी आहेत. इतक्या उच्च स्वरात गाणे हे विशेषच आहे.


आपल्या परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांना नेहमी मोहित करणारा दानिश या भागात फारच भावुक झाला आणि त्याने सुखविंदरकडे स्वाक्षरी मागितली. दानिशने आपले जॅकेट काढले, जेणे करून आपल्या टीशर्ट वर मागे सही घेता येईल आणि ती जपूनही ठेवता येईल. त्यानंतर, दानिश  मोहम्मदला ‘चल छैयां छैयां’ गाण्यावर सुखविंदरसोबत परफॉर्म करण्याची संधी मिळाली.

Web Title: Indian Idol 12: On the occasion of Eid, Danish Mohammad received Eid from the examiners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.