Indian Idol 12 : सवाई भट्टच्या चाहत्यांसाठी खुशखबर, शो सोडून न जाण्यासाठी मनविलं या व्यक्तीनं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:35 AM2021-04-26T10:35:05+5:302021-04-26T10:35:33+5:30

इंडियन आयडॉलचा स्पर्धक सवाई भट्टने नुकतीच शो सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Indian Idol 12: Good news for Sawai Bhatt fans, this person persuaded not to leave the show | Indian Idol 12 : सवाई भट्टच्या चाहत्यांसाठी खुशखबर, शो सोडून न जाण्यासाठी मनविलं या व्यक्तीनं

Indian Idol 12 : सवाई भट्टच्या चाहत्यांसाठी खुशखबर, शो सोडून न जाण्यासाठी मनविलं या व्यक्तीनं

googlenewsNext

सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२वा सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शोचा स्पर्धक सवाई भटने चाहत्यांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. नुकतेच सवाई शो सोडून जाणार असल्याचे वृत्त ऐकताच त्याचे चाहते नाराज झाले होते. मात्र आता आम्ही सवाईच्या चाहत्यांसाठी खुशखबर घेऊन आलो आहे. ही वाचून त्याचे चाहते खूश होणार आहेत. सवाई भट शो सोडून जाणार नाही आहे. या शोमधील एका व्यक्तीने त्याला शो सोडून न जाण्यासाठी मनविले आहे. 


स्पर्धक सवाई भटने नुकतेच शो सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती पण आता शोचा परिक्षक हिमेश रेशमियाने त्याला शो सोडून न जाण्यासाठी मनविले आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत सवाई बोलताना दिसतो आहे की त्याला शो सोडून जायचे आहे आणि आपल्या आईसोबत रहायचे आहे. त्याची आई तीन चार महिन्यांपासून आजारी आहे. सवाईला शो सोडून जाऊ नये म्हणून हिमेशने त्याला समजावले आहे.


हिमेश रेशमियाने बॉम्बे टाइम्सला सांगितले की, कसे त्याने सवाईला शोमध्ये राहण्यासाठी मनविले. हिमेशने सांगितले की, त्याला विश्वास दिला की, त्याचे आई वडिल मुंबईत येऊन त्याच्यासोबत राहतील. त्याच्यामुळे तो आई वडिलांसोबत राहू शकेल आणि आपल्या गायनावरही लक्ष केंद्रीत करू शकेल.


हिमेश रेशमिया पुढे म्हणाला की, सवाई शोमध्ये सुरूवातीपासून चांगलाच गातो आहे. त्यात इंडियन आयडॉल बनण्याची क्षमता आहे. आपल्या टॅलेंट आणि योग्य गायनाच्या कौशल्यावर तो करिअरमध्ये खूप काही कमावू शकतो. सवाई राजस्थानच्या एका छोट्या गावातून आला आहे आणि छोट्या गावातून संगीत रिएलिटी शोमध्ये भाग बनण्यासाठी तो कित्येक लोकांना प्रेरणादायी ठरला आहे.


हिमेश रेशमिया सवाई भटसोबत लवकरच गाणे रेकॉर्ड करणार आहे. याबद्दल हिमेशने सांगितले की, तो लवकरच माझ्यासोबत गाणे रेकॉर्ड करणार आहे. मी पवन, निहाल आणि मोहम्मद दानिशसोबत गाणे रेकॉर्ड केलेले आहे. मी त्यालाही लाँच करण्याची योजना करतो आहे आणि त्याला प्लॅटफॉर्म देणार आहे. यापूर्वीही मी असे केले आहे आणि भविष्यातही असे करत राहीन.

Web Title: Indian Idol 12: Good news for Sawai Bhatt fans, this person persuaded not to leave the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.