पुण्याचा समर्पण लामा ठरला 'इंडियाज बेस्ट डान्सर', म्हणाला, "आता माझ्या वडिलांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 04:32 PM2023-10-01T16:32:45+5:302023-10-01T16:34:00+5:30

इंडियाज बेस्ट डान्सरची ट्रॉफी पटकावल्यानंतर समर्पण म्हणाला...

India' s best dancer s3 grand finale pune boy samarpan lama won the show took trophy home | पुण्याचा समर्पण लामा ठरला 'इंडियाज बेस्ट डान्सर', म्हणाला, "आता माझ्या वडिलांना..."

पुण्याचा समर्पण लामा ठरला 'इंडियाज बेस्ट डान्सर', म्हणाला, "आता माझ्या वडिलांना..."

googlenewsNext

आपल्या डान्स मूव्ह्जने प्रेक्षकांना प्रभावित करणारा समर्पण लामा (Samarpan Lama) डान्स रिएलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर' (India's Best Dancer S3) चा विजेता ठरला आहे. पुण्याच्या समर्पणने ही ट्रॉफी जिंकत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. पाच महिने चाललेल्या या स्पर्धेतून समर्पणने सर्वांना मागे टाकत ट्रॉफी जिंकली. फिनाले मध्ये  टॉप ५ स्पर्धक होते. शिवांशु सोनी. विपुल कांडपाल, अनिकेत चौहान, अंजली ममगई यांना हरवत समर्पण विजेता ठरला.

इंडियाज बेस्ट डान्सरची ट्रॉफी पटकावल्यानंतर समर्पण म्हणाला,'खूपच चांगलं वाटतंय. मला नेहमीच डान्स रिएलिटी शोमध्ये सहभागी व्हायचं होतं. पण मी ट्रॉफी जिंकेल असा कधी विचारही केला नव्हता. हे एक स्वप्नच वाटत आहे.'

तो पुढे म्हणाला,'मी शोमध्ये यश आणि अपयश दोन्ही पाहिलं आहे. अपयशातून मी खूप काही शिकलो आहे. म्हणूनच आज मी चांगला डान्सर बनू शकलो. हा शो माझ्यासाठी खूप महत्वाचा टप्पा होता. यामध्ये मला आईबाबांची साथ मिळाली.'

समर्पणला विजेतेपदाची ट्रॉफी आणि १५ लाख रुपयांचं बक्षिस मिळालं.पुण्याचा राहणारा समर्पण लहानपणापासूनच डान्स करायचा. त्याचे वडील परदेशात नोकरी करायचे.पण आता त्यांना बाहेर काम करावं लागणार नाही अशी प्रतिक्रिया समर्पणने दिली.

Web Title: India' s best dancer s3 grand finale pune boy samarpan lama won the show took trophy home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.