इंद्रनेलने दिलेली ती वस्तू हरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:05 IST2016-10-17T17:05:44+5:302016-10-17T17:05:44+5:30
बरखा विष्ट आणि इंद्रनेलसेन गुप्ता हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. या दोघांची भेट प्यार के दो ...

इंद्रनेलने दिलेली ती वस्तू हरवली
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">बरखा विष्ट आणि इंद्रनेलसेन गुप्ता हे छोट्या पडद्यावरचे एक क्युट कपल मानले जाते. या दोघांची भेट प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 2007 साली लग्न केले. लग्नात इंद्रनेलने बरखाला दिलेली अंगठी नुकतीच हरवली. ही अंगठी बरखासाठी अमूल्य असल्याने बरखाला खूपच वाईट वाटले आहे. बरखा सांगते, "नामकरण या मालिकेच्या एका दृश्यासाठी मी माझे खरे दागिने घातले होते. त्यामुळे ही अंगठीदेखील चित्रीकरणाच्यावेळी माझ्या हातातच होती. या अंगठीची किंमत जवळजवळ साडे तीन लाख रुपये असल्याने मी ही अंगठी नेहमी घालत नाही आणि त्यातही ही अंगठी इंद्रनेलने मला दिल्यामुळे ती मी जपून ठेवते. नामकरणमध्ये माझ्या मुलीची भूमिका साकारणारी अवनी सुपरमार्केटमध्ये हरवते असे एक दृश्य आम्ही चित्रीत करत होते. या दृश्यानंतर माझ्या हातात अंगठी नसल्याचे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत पॅकअप झाल्यामुळे सेटवरचे लाईटही बंद करण्यात आले होते. अंधारात काहीच दिसत नव्हते. तरीही टॉर्चच्या साहाय्याने माझ्या संपूर्ण टीमने अंगठी शोधण्याचा जवळजवळ दोन-तीन तास तरी प्रयत्न केला. पण ती अंगठी काही मिळाली नाही. ही अंगठी मला इंद्रनेलने लग्नात घातली असल्यामुळे ती मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवणार असे मी ठरवले होते. अंगठी हरवल्यानंतर माझा मूड खूपच खराब झाला होता."