"२०२४ मध्ये माझ्या खूप जवळची व्यक्ती...", अक्षया हिंदळकरने व्यक्त केली ही खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:06 IST2024-12-26T19:05:21+5:302024-12-26T19:06:41+5:30
‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) मालिकेत वसुंधराची भूमिका अक्षया हिंदळकरने साकारली आहे. नुकतेच तिने २०२४ च्या वर्षातील एक खंत बोलून दाखवली आहे.

"२०२४ मध्ये माझ्या खूप जवळची व्यक्ती...", अक्षया हिंदळकरने व्यक्त केली ही खंत
‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) मालिकेला कमी कालावधीत रसिकांची पसंती मिळाली आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील वसुंधरा व आकाशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या दोघांच्या कुटुंबीयांमधील सर्व गैरसमज दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आकाश आणि वसुंधरा यांनी नव्याने त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे. दरम्यान मालिकेत वसुंधराची भूमिका अक्षया हिंदळकर(Akshaya Hindalkar)ने साकारली आहे. नुकतेच तिने २०२४ च्या वर्षातील एक खंत बोलून दाखवली आहे.
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील वसुंधरा म्हणजेच अक्षया हिंदळकर म्हणाली "२०२४ मध्ये मला बॉक्सिंग ट्रेनिंग पूर्ण करायचं होत पण ते राहून गेलं कारण शूटिंगमुळे वेळ नाही मिळाला. प्रयत्न करेन की नवीन वर्षात ते पूर्ण करेन. २०२४ मध्ये माझी खूप जवळची व्यक्ती माझी आजी आम्हाला सोडून गेली. मला कायम एक गोष्टीची खंत राहील की कामामुळे तिला हवा तसा वेळ देता आला नाही. तिला कुठे फिरायला घेऊन जाता आलं नाही. जर मला कुठची गोष्ट २०२४ ची पुन्हा करता आली तर आजीला वेळ देऊन, तिच्यासोबत फिरायला जायला आवडेल. तिच्याकडे अधिक लक्ष देईन."
वर्कफ्रंट
अक्षया हिंदळकर हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. इश्काचा नादखुळा मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. सध्या ती पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.