सना सय्यद करायला आवडली असती 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 08:30 PM2019-02-27T20:30:00+5:302019-02-27T20:30:00+5:30

दिव्य दृष्टी या मालिकेत अभिनेत्री सना सय्यद दृष्टीची प्रमुख भूमिका साकारत आहे. सनाकडे भविष्य पाहण्याची शक्ती असते.

If I had a superpower, I would love to fly- Sana Sayyad | सना सय्यद करायला आवडली असती 'ही' गोष्ट

सना सय्यद करायला आवडली असती 'ही' गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देसना सय्यद ह्या मालिकेत दृष्टीची प्रमुख भूमिका साकारत आहे.

अमानवी शक्तींवर आधारित आपल्या ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ‘स्टार प्लस’ वाहिनी सज्ज झाली आहे.  दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे. ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अभिनेत्री सना सय्यद ह्या मालिकेत दृष्टीची प्रमुख भूमिका साकारत आहे.

सना यात दृष्टीची भूमिका साकारत आहे तिच्याकडे भविष्य पाहण्याची शक्ती आहे. खऱ्या आयुष्यातही जर सुपरपॉवर मिळाली असती तर काय केले असते असे विचारले असता सना म्हणाली, “मला खऱ्या आयुष्यात निश्चितपणे दृष्टीची सुपरपॉवर हवी आहे म्हणजे मी भविष्य पाहू शकेन. त्याव्यतिरिक्त ह्या शक्तीचा वापर करून मला उडायला आवडेल. मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि मग मी उडून माझ्या सेटवर पोहोचू शकेन.” ती पुढे म्हणाली, “सुपरपॉवर असणे ही एक उत्साहाची गोष्ट आहे आणि माझी व्यक्तिरेखा दृष्टीला ती मिळाली आहे यासाठी मी स्वतःला लकी मानते, पण तिने त्याचा दुरूपयोग करणे बरोबर नाही.”

संगीता घोष या मालिकेत दिसणार आहे. यात ती खलनायिका म्हणजेच पिशाचिणीची भूमिका रंगविणार असून ती ही भूमिका कारण्यासाठी उत्साही आहे. अशा प्रकारची भूमिका ती प्रथमच साकारीत आहे. 
 

Web Title: If I had a superpower, I would love to fly- Sana Sayyad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.