मला सुरुवातीपासून हिंदी मालिका अथवा चित्रपटातच काम करायचे होतेः अक्षय म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 19:11 IST2017-03-07T13:41:17+5:302017-03-07T19:11:17+5:30

सावर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटात अक्षय म्हात्रेने काम केले होते. आता तो पिया अलबेला ...

I wanted to work in Hindi serial or from the beginning: Akshay Mhatre | मला सुरुवातीपासून हिंदी मालिका अथवा चित्रपटातच काम करायचे होतेः अक्षय म्हात्रे

मला सुरुवातीपासून हिंदी मालिका अथवा चित्रपटातच काम करायचे होतेः अक्षय म्हात्रे

वर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटात अक्षय म्हात्रेने काम केले होते. आता तो पिया अलबेला या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या या नव्या इनिंगबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

मराठी मालिका, चित्रपट करत असताना तू हिंदी मालिकेकडे कसा वळलास?
मी कॉलेजमध्ये असताना अनेक हिंदी नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी हिंदी रंगभूमीवरदेखील काम केले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट अथवा मालिकेत काम करायचे असे मी आधीच ठरवले होते. खरे तर मराठीत काम करण्याबाबत कधी मी विचारदेखील केला नव्हता. पण अचानक त्या गोष्टी घडल्या. मला मालिकेची ऑफर आली, ती मालिका प्रेक्षकांना आवडली. त्यामुळे मला चित्रपटात काम मिळाले आणि मराठी चित्रपटसृष्टीत माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. 

तू तुझ्या कारकिर्दीतील पहिलीच मालिका राजश्री प्रोडक्शनसोबत करत आहेस, या मालिकेत तुझी निवड झाल्यानंतर तुला किती आनंद झाला होता?
पिया अलबेला या मालिकेसाठी माझी निवड होऊन जवळजवळ आठ महिने झाले आहेत. पण या मालिकेत पूजा ही प्रमुख भूमिका कोण साकारणार हेच ठरत नव्हते. त्यासाठी प्रोडक्शन हाऊस अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन्स घेत होते. जोपर्यंत पूजा साकारण्यासाठी योग्य अभिनेत्री मिळणार नाही नाही, तोपर्यंत या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार नव्हती. त्यामुळे माझा आनंद मला इतके महिने लपवून ठेवावा लागला होता. पूजा या व्यक्तिरेखेसाठी शीना दासची निवड झाली आणि आम्ही मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली.

पिया अलबेला या मालिकेसाठी तुझी निवड कशाप्रकारे करण्यात आली?
मी राजश्री प्रोडक्शनसोबत पूर्वी एक शॉर्टफिल्म केली होती. त्याचवेळी त्यांना माझे काम खूप आवडले होते. पिया अलबेला या मालिकेसाठी त्यांच्याकडून माझे ऑ़डिशन आणि काही लूक टेस्ट घेण्यात आले. त्यानंतर या भूमिकेसाठी मी योग्य असल्याचे प्रोडक्शन हाऊसला वाटले आणि माझी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

पिया अलबेला या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण नुकतेच ऋषिकेश येथे करण्यात आले, हृषिकेश येथे चित्रीकरण करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
मी आतापर्यंत कधी ऋषिकेशला गेलोच नव्हतो. पण या मालिकेतील माझ्या भूमिकेनुसार मी ऋषिकेशमध्येच लहानाचा मोठा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ऋषिकेशला चित्रीकरण करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. ऋषिकेश येथील चित्रीकरण मी खूप एन्जॉय केले. ऋषिकेशला नदीत चित्रीकरण करत असताना मला दुखापतदेखील झाली. पण तरीही माझ्यासाठी हा अनुभव खूप चांगला होता. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो, ऋषिकेशमधील लोक कोणत्या लहेजात बोलतात हे जाणून घेण्यासाठी मी तेथील लोकांसोबत गप्पा मारल्या. तसेच चित्रीकरण झाल्यानंतर मी ऋषिकेशमधील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. 

Web Title: I wanted to work in Hindi serial or from the beginning: Akshay Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.