OMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 18:21 IST2018-12-15T18:19:05+5:302018-12-15T18:21:29+5:30
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचे जगभरात लाखो चाहते आहेत, पण खुद्द रणवीर मात्र डान्स+४ च्या सेटवरील कॅप्टन शक्ती मोहनचा मोठा चाहता आहे.

OMG - दीपिका नाही तर शक्ती मोहनच फॅन आहे रणवीर सिंग !
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचे जगभरात लाखो चाहते आहेत, पण खुद्द रणवीर मात्र डान्स+४ च्या सेटवरील कॅप्टन शक्ती मोहनचा मोठा चाहता आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर आपली सहकलाकार सारा अली खानसोबत डान्स+ ४ च्या मंचावर आला होता. शक्ती मोहनने दीपिका पादुकोणसाठी 'पद्मावत' चित्रपटात नैनो वाले ने हे गीत कोरियाग्राफ केले आहे. ती म्हणाली की रणवीरची ऊर्जा आणि एक माणूस व एक कलाकार म्हणून त्याच्या जबरदस्त ॲटिट्यूडमुळे ती खूपच प्रभावित झाली असून तो इतरांनाही प्रेरणा देतो. तो त्याचे आयुष्य भरभरून जगतो. ती पुढे म्हणाली की, पद्मामावतमध्ये तिला त्याची पत्नी दीपिकासाठी कोरियोग्राफी करण्याची संधी मिळाली पण त्याच्यासाठी नाही. शक्तीने मग त्याला त्याच्या आणि दीपिकाच्या चार्टबस्टर गीत अंग लगा दे वर डान्स करण्याची विनंती केली.
रणवीर म्हणाला, “मला एक कलाकार म्हणून शक्ती नेहमीच आवडली असून मी राऊडी राठोडमध्ये तिला आ रे प्रितम प्यारे वर डान्स करताना पाहिले तेव्हा तिचा परफॉर्मन्स पाहून थक्क झालो होतो आणि तिच्याबद्दल चौकशीही केली होती. मी शक्तीचा त्या गाण्यापासून मोठा चाहता असून आज तिच्यासोबत ह्या मंचावर नाचणे मी माझा सन्मान समजतो.” त्यानंतर रणवीरने आ रे प्रितम प्यारे ह्याच गीताची विनंती केली आणि तो तिच्यासोबत चित्रपटातील स्टेप्ससह नाचला.
रणवीर सिंगच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर 'सिम्बा'मध्ये त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे