अभिनय करतेय असे वाटतच नाही - कविता लाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 13:36 IST2016-06-25T08:06:25+5:302016-06-25T13:36:25+5:30
चार दिवस सासूचे ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील कविता लाडची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. कविता आता तुझ्यावाचून करमेना या ...

अभिनय करतेय असे वाटतच नाही - कविता लाड
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">चार दिवस सासूचे ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील कविता लाडची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. कविता आता तुझ्यावाचून करमेना या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी सीएनएक्ससोबत तिने मारलेल्या गप्पा...
छोट्या पडद्यावर तू खूपच कमी प्रमाणात काम करतेस असे का? ही मालिका स्वीकारण्यामागचे कारण काय?
चांगली भूमिका असल्याशिवाय कोणतीही भूमिका स्वीकारणार नाही असे माझे नेहमीच मत असते. कोणतीही मालिका, चित्रपट स्वीकारत असताना त्या मालिकेची टीम कशी आहे हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते. या मालिकेची निर्मिती संगीत कुलकर्णी यांची असल्याने मला कोणत्याच बाबतीत शंका नव्हती. तसेच या मालिकेची कथा अद्वैत दादरकर आणि शिरीष लाटकर यांची असल्याने मी मालिकेसाठी लगेचच होकार दिला. या मालिकेत दोन कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही कुटुंबांचा व्यवसाय एक असून त्यांचे कौटुंबिक नाते खूपच चांगले आहे. त्यामुळे हे नाते आयुष्यभरासाठी जोडले जावे असे त्यांना वाटत आहे. आपल्या मुला-मुलींनी लग्न करावे अशी त्यांची इच्छा आहे. ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीणही आहेत. पण नात्यात पडण्याचा त्यांनी कधीच विचारही केलेला नाही. ते एकत्र येतात की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे.
या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि कवितात किती साम्य आहे?
या मालिकेतील मला आवडलेली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ही व्यक्तिरेखा साकारताना अनेकवेळा मी अभिनय करत आहे असे मला वाटतच नाही. या मालिकेत मी एका मुलाच्या आईची भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यातही मला दोन मुलं आहेत. या मालिकेत मुलगा आणि नवऱयामध्ये माझे नेहमीच सँडविज होत असते. दोघांपैकी कोणाची बाजू घेऊ हे मला कळतच नाही. खऱया आयुष्यातही मी एक आई असल्याने हा अनुभव मला नेहमीच येत असतो. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, माझ्या मुलाला सायकल घ्यायची होती. पण पावसात सायकल घेतल्यास ती खराब होईल .त्यामुळे पावसानंतर सायकल घेऊया असे माझ्या नवऱयाचे म्हणणे होते. पण माझ्या मुलाला ती आताच हवी होती. शेवटी मी माझ्या नवऱयाला समजावले की, तो पावसात सायकल कमी वापरेल. पण त्याला सायकल घेऊन देऊया, नाहीतर तो छोटेसे तोंड करून बसेल. असे प्रसंग माझ्या आयुष्यात अनेकवेळा येत असतात. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण करताना मी माझे खरे आयुष्य जगत आहे असे मला वाटते.
या मालिकेच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा आहे?
- या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण आम्ही कोणत्याही सेटवर करत नसून खऱ्याखुऱ्या घरात करत आहोत. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण इतर मालिकांपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारे केले जात आहे. तसेच या मालिकेत विघ्नेश जोशी, आनंद काळे हे सहकलाकार आहेत. त्यांच्यासोबत मी आधीही काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा येतेय. तसेच या मालिकेत अभिजीत आमकर, सई घारपुरे ही नवीन मुले आहेत. त्यांना पाहून नवीन पिढी खूप मेहनत घेते असे मला वाटते.
छोट्या पडद्याबाबत तुझे काय मत आहे?
तुम्ही एखादी मालिका करत असता, त्यावेळी प्रेक्षकांना तुमची भूमिका आवडली तर ते तुम्हाला अक्षरशः डोक्यावर घेतात. प्रेक्षक त्या कलाकारावर नाही तर त्या व्यक्तिरेखेवर प्रेम करत असतात. पण त्यांची स्मरणशक्ती ही ठरावीक काळासाठी असते. कारण तुम्ही नवीन भूमिका साकारल्यावर प्रेक्षक तुमची जुनी भूमिका विसरून जातात असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे छोट्या पडद्यामुळे तुम्ही एका व्यक्तिरेखेत अडकले जाता असे म्हटले जाते हे चुकीचे आहे असे मला वाटते. या छोट्या पडद्यामुळे आम्हा कलाकारांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते.
या मालिकेत तुझ्या मुलाला अभिनयाची आवड आहे. पण तुझे पती त्याच्या या आवडीच्या विरोधात आहेत असे दाखवण्यात आले आहे. करियरच्या बाबतीत मुलांना मोकळीक द्यावी की नाही याबाबत तुला काय वाटतं?
या मालिकेत तुझ्या मुलाला अभिनयाची आवड आहे. पण तुझे पती त्याच्या या आवडीच्या विरोधात आहेत असे दाखवण्यात आले आहे. करियरच्या बाबतीत मुलांना मोकळीक द्यावी की नाही याबाबत तुला काय वाटतं?
प्रत्येक व्यक्तिला आपले करियर निवडण्याची संधी द्यावी असे माझे मत आहे. मला नाटकात काम करायचे असे ज्यावेळी मी माझ्या वडिलांना सांगितले होते, त्यावेळी चांगल्या कुटुंबातील मुली नाटकात काम करत नाही असे माझ्या वडिलांचे म्हणणे होते. पण मला अभिनयाची आवड असल्याने मी नाटकात काम करणे सुरूच ठेवले. मला चांगल्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळायला लागल्यावर त्यांचे मत बदलत गेले. तुम्ही तुमच्या आवडीचे काम निवडले तर ते तुम्ही ते अधिक आवडीने करता असे मला वाटते.