मैं बन गई खलनायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:18 IST2016-10-10T05:36:24+5:302016-10-17T10:18:42+5:30
देख भाई देख, गुटर गू, सतरंगी ससूराल यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री भावना बलसावर प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात ...
मैं बन गई खलनायिका
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">देख भाई देख, गुटर गू, सतरंगी ससूराल यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री भावना बलसावर प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. भावनाने आतापर्यंत विनोदी भूमिका साकारल्या आहेत. पण पहिल्यांदाच भावना एक नकारात्मक भूमिका साकारणार आहे. वारिस या मालिकेत जगन म्हणजेच अक्षय डोगराच्या सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांना तिला पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी ती सांगते, ही भूमिका स्वीकारताना मी सुरुवातील द्विधा मनस्थितीत होते. पण प्रत्येक कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असा विचार करूनच मी या मालिकेचा भाग बनले. मी ग्रे शेड असलेल्या व्यक्तिरेखा याआधी साकारल्या असल्या तरी ही भूमिका संपूर्णपणे नकारात्मक आहे आणि विशेष म्हणजे ही भूमिका एका बिहारी स्त्रीची आहे. बिहारी लोकांची बोलण्याची पद्धत ही खूप वेगळी असते. त्यामुळे माझ्या काही बिहारी मित्रांकडून ही भाषा आणि या भाषेचा लहेजा मी शिकले.