​मी असाच आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:13 IST2016-10-10T10:16:19+5:302016-10-17T10:13:27+5:30

सलमान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांचे सिक्स पॅक्स अॅब्स पाहिले की, आपलेदेखील अॅब्स असेच असावेत असे अनेक तरुणांना ...

I am like that | ​मी असाच आहे

​मी असाच आहे

मान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांचे सिक्स पॅक्स अॅब्स पाहिले की, आपलेदेखील अॅब्स असेच असावेत असे अनेक तरुणांना वाटत असते. त्यासाठी जीममध्ये कित्येक तास घाम गाळण्याचीही त्यांची तयारी असते. चित्रपटांमध्ये आपल्याला शर्टलेस हिरो अनेक वेळा पाहायला मिळतात. आता हाच ट्रेंड प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. वारिस या मालिकेत अक्षय डोगरा एका दृश्यात शर्टलेस दिसणार आहे. अक्षयचे शरीर चित्रपटातील अभिनेत्यांप्रमाणे पिळदार नसले तरी त्याने हे दृश्य दिले. याविषयी अक्षय सांगतो, "आजकाल टिव्ही या माध्यमाचा लोकांवर अधिक परिणाम होता. तुमची शरीरयष्ठी पिळदार असलीच पाहिजे ही गोष्ट आपण सतत मालिकांत, चित्रपटांमध्ये दाखवून आपण तरुणांवर शरीरयष्ठी पिळदार बनवण्यासाठी दबाव टाकत आहोत असे मला वाटते. मी जसा दिसतो, माझी शरीरयष्ठी ज्याप्रकारची आहे त्याबाबत मी प्रचंड खूश आहे. त्यामुळेच माझे शरीर पिळदार नसतानाही मी दृश्यात शर्ट न घालण्याचा निर्णय घेतला."

Web Title: I am like that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.