पती माझा आज्ञाधारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 20:41 IST2016-11-27T20:41:21+5:302016-11-27T20:41:21+5:30

‘वजह तुम हो’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणारा अभिनेता गुरमीत चौधरी हा एक आदर्श पती आहे. त्याची पत्नी ...

Husband is my commander | पती माझा आज्ञाधारी

पती माझा आज्ञाधारी

जह तुम हो’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणारा अभिनेता गुरमीत चौधरी हा एक आदर्श पती आहे. त्याची पत्नी अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या मते गुरमीत कुठलीही स्क्रिप्ट अगोदर मला वाचून दाखवितो. 

२००८ मध्ये आलेल्या ‘रामायण’ या प्रसिद्ध मालिकेत सीतेची भूमिका साकारणाºया देबिनाने सांगितले की, ‘वजह तुम हो’ हा चित्रपट त्या सर्व कथांमध्ये सहभागी आहे, ज्याची स्क्रिप्ट मी अगोदरच वाचलेली आहे. कारण नेहमीप्रमाणेच गुरमीतने याही चित्रपटाची स्क्रिप्ट अगोदरच मला वाचायला दिली होती. चित्रपटातील त्याच्या लुकबद्दल देबिनाने सांगितले की, तो खूपच सुंदर दिसत आहे. मी चित्रपटाचा ट्रेलर बघितला आहे. आता मला चित्रपट बघण्याची उत्सुकता लागली आहे. 

एका कलाकारामध्ये जे गुण असायला हवेत ते सर्वच गुरमित आहेत. विशाल पांड्या दिग्दर्शित ‘वजह तुम हो’मध्ये शरमन जोशी आणि सना खान यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सना आणि गुरमीतमधील इंटिमेंट सिन्समुळे देबिना नाराज झाली होती, अशी मध्यंतरी चर्चा रंगली होती. 

Web Title: Husband is my commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.