'सरस्वती' मालिकेत पती पत्नी आणि वो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 10:48 IST2016-10-21T10:47:52+5:302016-10-21T10:48:15+5:30

छोट्या पडद्यावरील सरस्वती ही मालिका मराठी रसिकांना चांगलीच भावते आहे. मालिकेत सरस्वती आणि राघव यांचा संसारही सुखात सुरु आहे. ...

Husband and wife in 'Saraswati' series ... | 'सरस्वती' मालिकेत पती पत्नी आणि वो....

'सरस्वती' मालिकेत पती पत्नी आणि वो....

ट्या पडद्यावरील सरस्वती ही मालिका मराठी रसिकांना चांगलीच भावते आहे. मालिकेत सरस्वती आणि राघव यांचा संसारही सुखात सुरु आहे. मात्र आता या मालिकेत रसिकांना एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. सरस्वतीमध्ये नव्याने एंट्री होणा-या व्यक्तीरेखेचं नाव सारा असे आहे. सारा आणि राघवचे कनेक्शन या मालिकेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. सारा ही राघवसोबत ऑस्ट्रेलियामध्ये शिकत होती आणि दोघांची कॉलेजपासूनची मैत्री असल्याचे या मालिकेत पाहायला मिळेल. मात्र याच नव्या एंट्रीचा फायदा घेऊन राघव आणि सरस्वतीमध्ये दुरावा आणण्याचाही प्रयत्न होणार असल्याचे आगामी भागात पाहायला मिळेल. राघवच्या कुटुंबीयांना सरस्वती फारशी आवडत नाही. त्यामुळे ते सरस्वतीबद्दल साराला भडकावण्यास सुरुवात करतात. राघवचे मात्र सरस्वतीवर जीवापाड प्रेम आहे. मात्र अचानक त्याच्यासमोर त्याची जुनी कॉलेज मैत्रीण सारा आली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत राघव, सरस्वती आणि सारा यांचे सारे आयुष्यच पालटणार असल्याचे या मालिकेत रसिकांना पाहायला मिळेल. राघवच्या घरच्यांनी सांगितलेलेल्या गोष्टींवर सारा विश्वास ठेवेल का ? ती सरस्वती आणि राघवच्या सुखी संसारात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल का ? सरस्वतीचा प्रत्यक्षात कशी आहे हे कळल्यावर साराचं मनपरिवर्तन होईल का ? राघवच्या मनातील साध्या भोळ्या आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणा-या सरस्वतीचे काय होईल ?ऑस्ट्रेलियावरुन आलेली सारा सरस्वतीची जागा घेईल का ? सारापेक्षा आपण कमी पडतो असा विचार सरस्वतीच्या मनात डोकावेल ? हे असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे रसिकांना सरस्वती मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. त्यामुळे या मालिकेतील हा ट्विस्ट रसिकांना खिळवून ठेवणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.
 

Web Title: Husband and wife in 'Saraswati' series ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.