​‘स्ट्रॉबेरी’ करणार तुम्हाला भर उन्हाळ्यात आणखी हॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 21:16 IST2016-04-04T04:16:37+5:302016-04-03T21:16:37+5:30

‘स्ट्रॉबेरी’ या आगामी मराठी नाटकाचं हॉट पोस्टर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेलं आहे. एक स्ट्रॉबेरी ओठात घेतलेले नायक आणि ...

Hot for you to do 'strawberries' hot in the summer | ​‘स्ट्रॉबेरी’ करणार तुम्हाला भर उन्हाळ्यात आणखी हॉट

​‘स्ट्रॉबेरी’ करणार तुम्हाला भर उन्हाळ्यात आणखी हॉट

्ट्रॉबेरी’ या आगामी मराठी नाटकाचं हॉट पोस्टर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेलं आहे. एक स्ट्रॉबेरी ओठात घेतलेले नायक आणि नायिका नेमके कोण आहेत? काय नवीन आहे या नाटकात? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. 

अभिजीत साटम आणि ऋतूजा प्रॉडक्शन ‘स्ट्रॉबेरी’ हे  नाटक १४ एप्रिल पासून रंगभूमीवर आपला जलवा दाखविणार आहे. अभिजीत झुंझारराव दिग्दर्शित या नाटकात ‘का रे दुरावा’ फेम जय  आदिती म्हणजे सुयश टिळक आणि सुरूची अडारकर यांची मुख्य भूमिका  आहे. ‘लव्ह स्टोरीतल्या लव्हची स्टोरी’  अशी टॅग लाईन असलेल्या या नाटकाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. 

एकंदरीत या ‘स्ट्रॉबेरी’ चं अतिशय हॉट पोस्टर, यातील कॉसच्युम, सेट आणि अर्थातच या नाटकाचा आजच्या पिढीला भावणारा फ्रे श विषय, यावरून तरी ‘स्ट्रॉबेरी’ नक्कीच रसरशीत असणारच यात शंका नाही. लेखक दत्ता पाटील यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नवं नाटक मराठी रंगभूमिला नक्कीच नवा आयाम देईल. 

Web Title: Hot for you to do 'strawberries' hot in the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.