‘बिग बॉस9’मधील रोशेल राव ही हॉट गर्ल आठवतेयं. रोशेलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कपिल शर्माच्या बहुप्रतिक्षीत ‘दी कपिल ...
हॉट रोशेल लावणार कॉमेडीचा तडका
/>‘बिग बॉस9’मधील रोशेल राव ही हॉट गर्ल आठवतेयं. रोशेलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कपिल शर्माच्या बहुप्रतिक्षीत ‘दी कपिल शर्मा शो’मध्ये रोशेल दिसणार आहे. सेलिब्रिटी गेस्ट म्हणून नव्हे तर कपिलच्या टीममधील एक टीम मेंबर म्हणून रोशल या शोमध्ये कॉमेडीचा तडका लावणार आहे. निश्चितपणे रोशेलसाठी ही मोठी संधी आहे आणि निश्चितपणे या संधीचे सोने करणे रोशेलला येते. खुद्द रोशेल ‘दी कपिल शर्मा शो’बद्दल सुपर एक्साइटेड आहे. ‘दी कपिल शर्मा शो’च्या टीमसोबत शूटींग करताना जाम मज्जा आली. त्यांनी मला सामावून घेतले. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे नुसती धम्माल मस्ती. ‘दी कपिल शर्मा शो’ ही निश्चितपणे माझ्या स्वभावगुणानुसार मिळालेली आगळीवेगळी संधी आहे. पण एक अभिनेत्री या नात्याने आव्हाने स्वीकारलायला मला नेहमीच आवडतात. कॉमिक टायमिंग आणि हिंदीसह ‘दी कपिल शर्मा शो’च्या टीम सोबत काम करणे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे. यातील माझी भूमिका माझ्या रिअल लाईफशी मिळती जुळती आहे..पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे करताना मला मिळत असलेला आनंद अनोखा आहे, असे रोशेल म्हणाली.