वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 05:48 PM2024-05-04T17:48:13+5:302024-05-04T17:49:47+5:30

हिंदी मालिकाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्रीवर वयाच्या ७ व्या वर्षी राहतं घर सोडण्याची वेळ आली होती.

hindi television actress big boss fame hina khan ran away from his own house at the age 7 year know about this  | वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती?

वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती?

Hina khan : स्टार प्लसवरील 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. आजही चाहत्यांमध्ये या मालिकेची क्रेझ पाहायला मिळते. अभिनेत्री हिना खानला या मालिकेने नवी ओळख मिळवून दिली. छोट्या पडद्यावर अक्षरा या नावाने ती प्रचलित झाली.  'बिग बॉस' सारखा शो देखील तिने गाजवला आहे. पण एके दिवशी अभिनेत्रीवर अचानक घर सोडण्याची वेळ आली होती. 

अभिनेत्री हिना खानच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर, सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते. पण वयाच्या ७ व्या वर्षी हिना खान घरातून पळाली होती. ही गोष्ट क्वचितच कोणाला माहित असेल. डीएनच्या रिपोर्टनुसार, हिना खानने सांगितलं, ''मी गॅस पेटवला, बागेतून काही झाडाची पानं तोडून आणली.  त्यांना प्लास्टिकच्या बास्केटमध्ये भरून ते बास्केट पेटत्या गॅसवर ठेवलं. जसं बास्केट गॅसवर वितळू लागलं ते पाहून मी घाबरल्यामुळे घरातून पळून गेले. मला पोलिसांनी शोधून काढलं आणि मी घरात परत आले. त्यानंतर मी पुन्हा कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवलं नाही. ''

या कारणामुळे हिनाला मालिकेतून काढलं होतं बाहेर :

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली. दरम्यान, या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी हिना खानने मालिका सोडण्यामागचं  खरं कारण सांगितलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्यं केलं आहे. हिना खानने ही मालिका सोडली नव्हती तर तिला या मालिकेमधून बाहेर काढण्यात आलं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर शिवांगी जोशीला या मालिकेच्या दुसऱ्या भागात  कास्ट करण्यात आलं होतं. 

अभिनेत्री हिना खान आणि शिवांगी जोशी यांच्या वयामध्ये जवळपास ११ वर्षाच अंतर आहे. या मालिकेतील एक सीन करण्यास हिना खानने नकार दिल्याने तिला या मालिकेतून  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, असा खुलासा निर्माते राजन शाही यांनी केला.

Web Title: hindi television actress big boss fame hina khan ran away from his own house at the age 7 year know about this 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.