२२ तास काम, सेटवर फरशीवरच झोपायचा; लोकप्रिय अभिनेत्याचा इंडस्ट्रीबद्दल खुलासा, म्हणाला- "काम करुनही पैसे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:52 IST2025-10-29T10:50:09+5:302025-10-29T10:52:35+5:30
ब्रेक न घेता २२ तास काम केलं अन्; लोकप्रिय अभिनेत्याने केली इंडस्ट्रीची पोलखोल, दीपिका पादूकोणच्या मागणीबद्दल म्हणाला...

२२ तास काम, सेटवर फरशीवरच झोपायचा; लोकप्रिय अभिनेत्याचा इंडस्ट्रीबद्दल खुलासा, म्हणाला- "काम करुनही पैसे..."
Hiten Tejwani: टीव्ही इंडस्ट्रीतल्या देखण्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे हितेन तेजवानी. 'घर एक मंदिर','कुटुंब' आणि 'क्योंकि सास भी कभी बहू थी'तसेच पवित्र रिश्ता या मालिकांमध्ये हितेन तेजवानीनं साकारलेल्या भूमिका गाजल्या. गेली २५ वर्ष तो या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अलिकडेच अभिनेत्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या प्रवासातील चांगल्या-वाईट अनुभवांसह अनेक गोष्टी शेअर केल्या.याचदरम्यान, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं किती कठीण आहे, यावरही त्याने भाष्य केलं.
नुकतीच हितेन तेजवानीने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेत्याने इंडस्ट्रीतील त्याच्या संघर्षकाळाविषयी सांगितलं. तेव्हा तो म्हणाला,गेली २५ वर्ष मी खूप मेहनत केली आहे. मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मी फक्त अंघोळ करण्यासाठी,कपडे बदलण्यासाठी घरी जायचो. यादरम्यान मी जे ड्रायव्हर ठेवले होते, पण ते सर्व निघून गेले.कारण, त्यांना माझे कामाच्या तासांमुळे अॅडजस्ट करता येत नव्हतं. अनेकदा असंही घडलंय की, मी स्वतः गाडी चालवायचो आणि गाडी चालवताना झोपी जायचो. एकदा तर माझी गाडी डिव्हायडरला धडकली होती. पण,देवाच्या कृपेने काहीही झाले नाही." तसंच हितेनला बऱ्याचदा त्याच्या कामाच्या पैसेही देण्यात आले नव्हते, असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीमध्ये केला.
मग पुढे त्याने म्हटलं, "इतकंच नाही मी सलग ३० दिवस ३० अतिरिक्त काम केलं आहे. जेव्हा मला या कामासाठी पहिल्यांदा १ लाख रुपयांचा चेक मिळाला तेव्हा मला खूप आनंद झाला. जर माझी नोकरी केली असती तर मी कदाचित इतक्या लवकर इतके पैसे कमवू शकलो नसतो. बऱ्याचदा आमच्या कामाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असायचं, तर कधी शूटिंग पहाटे ५ वाजेपर्यंत चालायचं.कधीकधी तर पुढची शिफ्ट सकाळी ७ वाजता सुरू व्हायची.सुमारे २२ तास काम चालायचं.काही क्रू मेंबर्स मला झोपण्यासाठी लाईट बंद करायचे आणि मी तिथेच सेटवर झोपायचो."
दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य...
दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीबद्दल बोलताना हितेन म्हणाला, "आता तुम्ही नॉनस्टॉप काम करु शकता. कारण,आता कॅमेरा सर्वकाही टिपतो, जरी कोणी थकले असले तरी ते स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे मला वाटतं की काम आणि आयुष्यातील संतुलन खूप महत्वाचे आहे." असं मत अभिनेत्याने व्यक्त केलं.