चित्रपटासाठी टिना देसाईला या अभिनेत्याने दिले हिंदीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 15:56 IST2018-04-24T10:26:32+5:302018-04-24T15:56:32+5:30
दिग्दर्शक सुजय घोष यांचा ‘तीन पहेलिया’ हा लघुपट ‘मिर्ची मालिनी’, ‘कॉपी’ आणि ‘गुडलक’ या तीन छोट्या कथांचा मिळून बनला ...
चित्रपटासाठी टिना देसाईला या अभिनेत्याने दिले हिंदीचे धडे
द ग्दर्शक सुजय घोष यांचा ‘तीन पहेलिया’ हा लघुपट ‘मिर्ची मालिनी’, ‘कॉपी’ आणि ‘गुडलक’ या तीन छोट्या कथांचा मिळून बनला आहे. या तिन्ही लघुपटांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांनी भूमिका साकारल्या असून त्यात टिना देसाई आणि कुणाल रॉय-कपूर यांचाही समावेश आहे. ‘तीन पहेलिया’ लवकरच ‘स्टार प्लस’वरून प्रसारित केला जाईल.यातील ‘गुडलक’ या लघुपटात भूमिका साकारणारी टिना देसाईने यातील आपला सहकलाकार कुणाल रॉय-कपूर याच्याशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल अलीकडेच एका मुलाखतीत माहिती दिली.टिना म्हणाली, “कुणाल हा एक उत्तम सहकलाकार आणि मित्र आहे. या चित्रपटासाठी आवश्यक असलेली हिंदी भाषा त्यानेच मला शिकविली. मला हिंदी तितक्या सफाईदारपमे बोलता येत नाही; तसंच माझं पाठांतर आणि उच्चारही तितकेसे ठीक नाहीत. पण कुणालने मला बरंच काही शिकवलं आणि त्याबद्दल मी त्याची आभारी आहे.” ‘द बेस्ट एक्झॉटिक मॅरीगोल्ड हॉटेल’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटातील पदार्पणातील भूमिकेबद्दल तसेच या चित्रपटाच्या ‘द सेकंड बेस्ट एक्झॉटिक मॅरीगोल्ड हॉटेल’ या पुढच्या भागातील भूमिकेबद्दल विख्यात झालेल्या या अभिनेत्रीने ‘सेन्स 8’ या वेब सीरिजमधील भूमिकेची समीक्षकांनी खूपच प्रशंसा केली आहे. ‘टेबल नंबर 21’ या हिंदी चित्रपटातही तिने प्रमुख भूमिका रंगविली असून त्यामुळे तिला हिंदी चित्रपटसृष्टीत मान्यता लाभली.
यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात ‘स्टार प्लस’ आपल्या प्रेक्षकांसाठी एक थरारक मालिका घेऊन येत आहे. आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ध्येयानुसार ‘स्टार प्लस’ने यावेळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुजय घोष यांच्याशी सहकार्याचा करार केला आहे.'कहानी','टीन','कहानी-2 : दुर्गा रानी सिंह' यासारख्या रहस्यपटांचे दिग्दर्शन आणि पटकथाकार म्हणून सुजय घोष ओळखले जातात. आपल्या गूढ- रहस्यमय चित्रपटांसाठी विख्यात असलेले सुजय घोष ‘स्टार प्लस’वर तीन चित्रपट सादर करणार आहेत. हे तीन लघुपट ‘तीन पहेलिया’ या सार्थ नावाखाली ‘स्टार प्लस’वरून प्रसारित केले जातील.