Hina Khan : ना विश्वासघात, ना ब्रेकअप ...! हिना खानने पब्लिसिटीसाठी रचलं ‘षडयंत्र’...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 04:03 PM2022-12-07T16:03:39+5:302022-12-07T16:05:49+5:30

Hina Khan : काल हिनाने अशी काही पोस्ट लिहिली की, लोकांनी भलताच अर्थ काढला. हिना व रॉकीचं ब्रेकअप झालं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

hina khan fooled fans no breakup romoted web series shadyantra teaser | Hina Khan : ना विश्वासघात, ना ब्रेकअप ...! हिना खानने पब्लिसिटीसाठी रचलं ‘षडयंत्र’...!

Hina Khan : ना विश्वासघात, ना ब्रेकअप ...! हिना खानने पब्लिसिटीसाठी रचलं ‘षडयंत्र’...!

googlenewsNext

काल हिना खानने एक पोस्ट केली आणि तिच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यात. हिना खान गेल्या अनेक वर्षांपासून रॉकी जयस्वालला डेट करतेय. मात्र काल हिनाने अशी काही पोस्ट लिहिली की, लोकांनी भलताच अर्थ काढला. हिना व रॉकीचं ब्रेकअप झालं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

‘विश्वासघात हे एकमात्र सत्य आहे जे टिकून राहतं,’अशी एक पोस्ट हिनाने शेअर केली.  दुसऱ्या पोस्टमध्ये तिने रिलेशनशिपबद्दल लिहिलं. ‘ज्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवण्यासाठी स्वत:ला माफ करायला विसरू नका. कधी कधी एक चांगलं मन वाईट गोष्टींना पाहू शकत नाही,’ असं तिने म्हटलंं. हिनाने एकापाठोपाठ एक दोन पोस्ट शेअर केल्या आणि या पोस्टमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. पण या पोस्ट शेअर करण्यामागचं कारण काही वेगळंच निघालं.

ब्रेकअप नाहीच...

हिना व रॉकीचं ब्रेकअप वगैरे झालेलं नाही. हिना आजही रॉकी सोबत आहे. मग या पोस्ट कशासाठी? तर नव्या प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी. होय, हिनाने आपल्या नव्या प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी वापरलेला हा फंडा होता. हिनाची ‘षडयंत्र’ नावाची नवी सीरिज येतेय. यात अनेक रहस्य उलगडणार आहेत, विश्वास घात करणाऱ्यांचा पर्दाफाश होणार आहे. सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. आपल्या याच सीरिजला प्रमोट करण्यासाठी हिनाने त्या पोस्ट लिहिल्या होत्या.
या सीरिजमध्ये हिनासोबत कुणाल कपूर, चंदन रॉय सान्याल मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज कधी रिलीज होईल, याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही.

हिनाच्या लव्हलाईफबद्दल सांगायचं तर हिना आणि रॉकी गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती. 2009 मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून हिना खानने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. हिनाचा बॉयफ्रेन्ड रॉकी जयस्वाल या मालिकेत सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून काम करत होता. मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिली भेट झाली होती. हिना ‘बिग बॉस’मध्ये गेली तेव्हा रॉकी तिला भेटायला आला आणि त्याच वेळी त्याने नॅशनल टीव्हीवर तिला प्रपोज केलं होतं. त्यावर हिनानेही त्याला होकार दिला होता.

Web Title: hina khan fooled fans no breakup romoted web series shadyantra teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.