हिना खान पडली ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:37 IST2018-11-21T14:36:25+5:302018-11-21T14:37:46+5:30

स्टार प्लस वाहिनीवर 'कसौटी जिंदगी की २' ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे आणि या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Hina Khan falls in love with this character | हिना खान पडली ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात

हिना खान पडली ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात

ठळक मुद्दे कोमोलिकाची भूमिका चॅलेंजिंग - हिना खानकोमोलिका व्यक्तिरेखेच्या पडली प्रेमात - हिना खान


स्टार प्लस वाहिनीवर 'कसौटी जिंदगी की २' ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे आणि या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील पहिल्या भागात कोमोलिकाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. ही भूमिका उर्वशी ढोलकियाने साकारली होती. मात्र आता या मालिकेच्या दुसऱ्या भागात कोमोलिकाची भूमिका हिना खान करते आहे. ही व्यक्तिरेखा साकारणे आव्हान अाहे आणि रंजकदेखील आहे. त्यामुळे मी या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडल्याचे हिनाने सांगितले. 


हिना म्हणाली की, 'कोमोलिकासारखी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे हा कलाकाराचा बहुमानच आहे, असे मी समजते. ही व्यक्तिरेखा उभी करणे हे एक आव्हान आहे आणि ती तितकीच रंजकही आहे. त्यामुळेच मी या व्यक्तिरेखेच्या लगेचच प्रेमात पडले. माझ्यातील अभिनेत्रीच्या अभिनयाचा कस लागेल, अशा एखाद्या नव्या भूमिकेच्या मी शोधात होते.
‘कसौटी जिंदगी के’ ही माझी आवडती मालिका होती आणि त्यातील कोमोलिकाची व्यक्तिरेखा ही तर माझ्या खास आवडीची होती. त्यामुळेच मला ही व्यक्तिरेखा रंगविण्याची संधी मिळताच मी त्यास तात्काळ होकार दिला. '
या भूमिकेच्या तयारीबाबत हिना म्हणाली की,' उर्वशीने साकार केलेली कोमोलिकाची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर आजही ठसठशीतपणे कोरली गेलेली असून तिच्यासारख्या अपेक्षांची पूर्ती करणे हे एक आव्हान नक्कीच असेल. उर्वशी मॅडमनी साकारलेल्या कोमोलिकाशी स्पर्धा करणे हे जवळपस अशक्य असले, तरी एकता मॅडमचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याच्या जोरावर मी या भूमिकेला निश्चितच न्याय देईन, असे वाटते.'
हिना खानने साकारलेली कोमोलिका रसिकांना कितपत भावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Hina Khan falls in love with this character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.