हिमेश, शान, पापॉन आणि पलक लहान मुलांना कोणत्या गोष्टीने करणार आकर्षित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:38 IST2017-11-27T10:08:37+5:302017-11-27T15:38:37+5:30
देशभरातून आलेल्या महत्त्वाकांक्षी गायकांनी ब्लाईंड ऑडिशन राऊंडमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स देत द व्हॉईस इंडिया किड्स या सिंगिंग रिआलिटी शोने चांगलीच ...
हिमेश, शान, पापॉन आणि पलक लहान मुलांना कोणत्या गोष्टीने करणार आकर्षित?
देशाच्या कानाकोपऱ्यातील गायन प्रतिभा दाखविण्याची आणि प्रोत्साहित करण्याची 'दी व्हॉईस इंडिया किड्स सिझन २' ची योजना आहे. तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य माणूस, या स्टेजवर केवळ उत्तम आवाज असणा-यांनाच संधी मिळते. ‘दी व्हॉईस इंडिया किड्स’ मधून प्रख्यात बॉलिवुड संगीतकार राम शंकर यांची मुलगी स्नेहा शंकर टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. 'बिच्छू', 'दुल्हे राजा' आणि 'परदेसी बाबू'सारख्या नावाजलेल्या सिनेमांसाठी त्यांनी काम केले आहे. राम शंकर यांनी संगीत क्षेत्रात ३५ वर्षे दिली आणि आता त्यांची मुलगी त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसते आहे.यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, “या शो मध्ये स्नेहा (माझी मुलगी) सहभागी होत आहे याचा मला खूप आनंद होतो आहे कारण मुलांच्या आवाजाच्या क्षमतेवरच इथे प्रशिक्षक मुलांची निवड करतात. ‘दी व्हॉईस इंडिया किड्स’ एक असे व्यासपीठ आहे जिथे ती तिचे खरे गुण, तिची विविधता आणि तिच्या वयाकडून असणा-या अपेक्षांपेक्षा आपण अधिक आहोत, हे दाखवून देऊ शकेल. स्नेहा आणि तिच्या गाण्याविषयी प्रशिक्षक नक्की काय सांगतात हे बघण्यासाठी मी उत्सुक शंकर महादेवन यांनी सांगितले होते.