हेमंत करणार सोनालीसोबत रोमँटिक साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 01:05 IST2016-03-18T08:03:25+5:302016-03-18T01:05:21+5:30
विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसविणारा सगळ््यांचा लाडका हेमंत ढोमे म्हणे आता रोमँटिक साँग ...

हेमंत करणार सोनालीसोबत रोमँटिक साँग
विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसविणारा सगळ््यांचा लाडका हेमंत ढोमे म्हणे आता रोमँटिक साँग करणार आहे. पोश्टर गर्ल या सिनेमातून त्याने मुली वाचवा हा अप्रतिम संदेश देऊन एक गंभीर विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. परंतू रसिकांना त्यामध्ये एक कमी जाणवली आणि ती म्हणजे सोनाली आणि हेमंतचे रोमँटिक साँग. हेमंतचे चाहते त्याला म्हणतायेत, आम्हाला तुझे अन सोनालीचे रोमँटिक साँग अजुन मोठ्या पडद्यावर पहायला मिळाले नाही. यावर हेमंत म्हणतोय नेक्ट टाईम रोमँटिक साँग शुअर. आता हे आपण खरच समजायच कि लवकरच पोश्टर गर्लचा नेक्ट पार्ट येतोय ते कळेलच पण हेमंत आणि सोनालीचे जबरदस्त रोमँटिक साँग आता त्यांच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर लवकरच पहायला मिळणार अशी आशा करायला काहीच हरकत नाही.