"लोकांचे टोमणे, नाराजी...", हेमांगीला आईकडून खास सरप्राइज, व्हिडिओ पाहून अभिनेत्री कॅमेरासमोरच रडली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:14 PM2024-05-12T12:14:40+5:302024-05-12T12:15:00+5:30

Mothers Day : हेमांगी कवीला आईकडून मिळालं खास सरप्राइज, अभिनेत्री भावुक

hemangi kavi gets emotional as mother give surprise her on madness machayende show shared video | "लोकांचे टोमणे, नाराजी...", हेमांगीला आईकडून खास सरप्राइज, व्हिडिओ पाहून अभिनेत्री कॅमेरासमोरच रडली

"लोकांचे टोमणे, नाराजी...", हेमांगीला आईकडून खास सरप्राइज, व्हिडिओ पाहून अभिनेत्री कॅमेरासमोरच रडली

हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या हेमांगीने प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीबरोबरच हेमांगी आता हिंदी मनोरंजनसृष्टीही गाजवत आहे. मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे या हिंदी कॉमेडी शोमधून हेमांगी प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. मदर्स डे निमित्त हेमांगीला तिच्या आईकडून  मॅडनेसच्या मंचावर खास सरप्राइज मिळालं आहे. 

हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडी आणि अपडेट ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते.  मॅडनेसच्या मंचावर हेमांगीला तिच्या आईकडून खास सरप्राइज मिळालं. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडिओत हेमांगीची आई तिच्या बालपणीच्या आठवणी सांगताना दिसत आहे. आईचं हे सरप्राइज पाहून हेमांगी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर प्रेम असतं. ते दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मूल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करू शकत नाही. पण जेव्हा हीच मुलं मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके/ वेगळी वाट निवडतात ना तेव्हा त्या मुलांसोबत त्या आईचा ही struggle सुरु होतो! हा video पाहताना माझ्या आईचा सगळा struggle, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरून आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला! (Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं!)

 

Mother’s Day निमित्ताने आज मी तिला Surprise, Gift द्यायला हवं होतं पण तिनेच Madness Machayenge च्या ‘Mother’s Day special’ episode मध्ये हा video पाठवून मला हे Surprise आणि गोड gift दिलं! या video साठी मी @sonytvofficial आणि @optimystixmediaच्या संपुर्ण teamचे आभार मानते! एवढ्या मोठ्या मंचावर 1st time माझी Mummy दिसणार! Yay! My mommy bestest! 

हेमांगीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

Web Title: hemangi kavi gets emotional as mother give surprise her on madness machayende show shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.