दिल दोस्ती दुनियादारी पुन्हा करणार कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 13:47 IST2017-01-21T08:17:37+5:302017-01-21T13:47:37+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य आधिराज्य गाजविले आहे. ही मालिका बंद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी निर्माण ...

The heart of friendship will repeat the world of war again | दिल दोस्ती दुनियादारी पुन्हा करणार कल्ला

दिल दोस्ती दुनियादारी पुन्हा करणार कल्ला

ल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य आधिराज्य गाजविले आहे. ही मालिका बंद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी निर्माण झाली होती. आता मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. ही मालिका लवकरच सुरू होणार असल्याचे समजत आहे. गेली कित्येक दिवस ही मालिका सुरू होणार अशा अफवा पसरत होत्या. आता मात्र ही अफवा नसून खरचं ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटिला येणार असल्याचे समजत आहे.  या मालिकेत अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर या कलाकारांचा कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. हेच कलाकार पुन्हा दिल दोस्ती दुनियादारी करण्यास सज्ज झाले असल्याचे समजत आहे. त्याचबरोबर या टीमसोबत आणखी दोन कलाकार पाहायला मिळणार आहे.  या मालिकेचे चित्रिकरणदेखील चालू असल्याचे कळत आहे. मात्र ही मालिका कधी सुरू होणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. या मालिकेचा पहिला सीझन तसाच पुढे सुरू करणार नसून पुन्हा नवीन अशी दिल दोस्ती दुनियादारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक बदलले आहेत. या मालिकेचे दुसºया सीझनचे दिग्दर्शक अव्दैत दादरकर असणार आहेत. अव्दैत यांनी यापूर्वी अनेक हीट नाटकं लिहीली आहेत. त्यांच्या या नाटकांमध्ये लगीनघाई, गोष्ट तशी गंमतीची, डोण्ट वरी बी हॅपी असे अनेक नाटकांचा समावेश आहेत. तसेच या मालिकेसाठी अभिषेक खाणकर संवाद लिहीणार आहेत. खुलता खळी खुलेना या मालिकेचे संवाददेखील अभिषेकचे आहेत. सुदीप मोडक याने कथा पटकथा लिहीली आहे. चला तर दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका पुन्हा पाहण्यासाठी थोडी वाट पाहूयात. 



 

Web Title: The heart of friendship will repeat the world of war again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.